सोलापूर – दशलक्षण पर्व समाप्ती निमित्त सोलापुरातील श्वेतांबर आणि दिगंबर समाजाची एकत्र जलयात्रा,श्री आदिनाथ मंदिर ,श्री बुबणे मंदिर, श्री कासार मंदिर, आणि श्री माणिक स्वामी मंदिर यांच्यातर्फे भगवंतांना पालखीमध्ये विराजमान करून सोवळे परिधान करून पुरुषांनी खांद्यावर पालखी नेऊन जयघोषात श्री गांधी नाथा रंगजी दिगंबर जिनमंगल प्रतिष्ठान येथील मंदिर प्रांगणात आणली.परमपूज्य 108 श्री सुप्रभ सागर महाराज,108 प्रणत सागर महाराज ,105 क्षुल्लक विप्रज्ञ सागर महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि पावन सानिध्यात भगवंताचा अभिषेक आणि क्षमावली कार्यक्रम संपन्न झाला. ज्ञानदीप महिला मंडळ यांनी दांडिया सादर केला.श्री गांधी नाथा रंगजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय गांधी यांनी स्वागत केले,श्री सुनील गांधी ,श्री चेतन बाफना ,श्री कन्नुभाई शहा यांनी क्षमा विरस्य भूषण व क्षमावली चे महत्व सांगितले. दीप प्रज्वलन,परमपूज्य गणाचार्य विरागसागर महाराज ,परमपूज्यपट्टाचार्य विशुद्ध सागर महाराज चित्र अनावरण,शास्त्र भेट पादप्रक्षालन,विविध बोली कार्यक्रम झाला. गांधीनाथा रंगजी जीन मंगल प्रतिष्ठान येथे दोन ,तीन, चार ऑक्टोबर रोजी विशुद्ध बाल संस्कार निवासी, निशुल्क शिबिर होणार आहे. परमपूज्य 108 सुप्रभ सागर महाराज यांनी *मिच्छामी दुक्कडम्* क्षमावलीनिमित्त जमलेल्या समस्त जैन बांधवांकडून कर्माची निर्जरा करा स्वतःच्या मध्ये कटूता ठेवू नका,स्वतःची चूक स्वीकार करा,मेरी भावना .. *मैत्री भाव जगत मे मेरा सब जीवों से नित्य रहे* मेरा किसी के प्रति वैरभाव नही अशी सामूहिक शमा वाणी गुरु साक्षीपूर्वक वदवून घेतली. *क्षमा माइक से बोलते क्षमा माईंड से बोलना* असे सांगितले.श्वेतांबर आणि दिगंबर समाजातील हजारो श्रावक सामूहिक क्षमावली कार्यक्रमास उपस्थित होते. नोव्हेंबर मध्ये कुमठे मंदिर येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव होणार आहे त्यानिमित्त सर्वांना आमंत्रण देण्यात आले. कुमठ्याचे प्रथमेश कासार यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
Post Views: 5