बार्शी – गुळपोळी येथे एका बांधकामाच्या ठिकाणी दारुच्या नशेत पाण्याच्या हौदात पालथे पडून एका मजुराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
राजेश चौहान (वय ४२ वर्षे, मूळ रा. मुरली, उत्तर प्रदेश) असे मृत मजुराचे नाव असून, तो येथे फरशी बसवण्याचे काम करत होता. चौहान हा गुळपोळी येथील उत्रेश्वर बाबासाहेब चिकणे यांच्या शेतातील घराच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करत होता. ९ जुलै दुपारी १ ते सायंकाळी ५-३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास राजेश हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा सहकारी अक्षय औदुंबर गुटकुळे याने त्याला जेवणाबाबत विचारले होते. मात्र, जेवण्यास नकार देऊन तो बाहेर पडला. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला.
Post Views: 5