सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथील प्रा.मुबीना रियाज मुजावर यांनी पिसिआय दिल्ली यांच्या इआर-२०२० अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक नियमानुसार टेक्स्ट बुक ऑफ फायटोकेमिस्ट्री या एम.फार्मसी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विषयावर पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक वालनट पब्लीकेशन, दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये फार्मसी क्षेत्राशी संबंधित वनस्पती मध्ये असणाऱ्या औषधाच्या विश्लेषणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती व त्यांचा फार्मसी क्षेत्रास होणारा फायदा याचा समावेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यामधून मोलाचे मार्गदर्शन व लाभ होणार आहे. या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.