सोलापूर – महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने ग्रंथालयाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत शासनास निवेदन पाठविले ग्रंथालयाचे ४०% अनुदान वाढीसाठी कॅबिनेट बैठकीत मंजुरी देऊन पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत तरतूद करावी व इतर मागण्या मंजूर करण्यात याव्यात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, देशातील एकूण ग्रंथालयापैकी महाराष्ट्रात २५% ग्रंथालये आहेत या ग्रंथालयातील कर्मचारी यांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पण ग्रंथालय कर्मचारी यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी विलंब लावतात यासाठी २४ जून २०२६ रोजी आझाद मैदान ते विधानभवन वर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी दिला आहे.प्रत्येक वेळेस आम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतल्यावर सकारात्मक आहोत निर्णय घेऊ असे आश्वासन घेऊन परत यायचे आश्वासनाने पोट भरत नाही निर्णय अपेक्षित आहे २५ जून २०१९ रोजी आ.प्रकाश आबिटकर यांनी सभागृहात ग्रंथालय अनुदान वाढ करावी अशी मागणी केली त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री आ.सुधीर मुनगटीवार यांनी सभागृहात ६०% अनुदान वाढीची घोषणा केली पण त्यांना त्याचे श्रेय जाते म्हणून वाढ करण्यात आली नाही तीच ६०%अनुदान वाढ सन २०२१-२०२२ ला मिळाली सध्या महागाई निर्देशांकानुसार अनुदान तिप्पट केले पाहिजे पण १८ डिसेंबर २०२३ रोजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ४०% वाढीचे आश्वासन दिले पण निर्णय झाला नाही सध्या अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असूनही ४०%अनुदान वाढीची फाईल मंजूर होत नाही धाडसी निर्णय घेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात कोणीही धरु शकत नाही मग ग्रंथालय अनुदान वाढीची फाईल मंजूर करण्यात वेळ का घालवता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवान करतो की आपण ग्रंथालय कर्मचारी यांच्या घरी एकदा भेट द्या म्हणजे मग कळेल तुटपुंज्या वेतनावर कर्मचारी संसाराचा गाडा कसा चालवतो आश्वासन बस झाले निर्णय देऊन कर्मचारी यांना दिलासा द्यावा असेही बेडगे यावेळी म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना सिद्राम मुद्देबिहाळ, धोंडिराम जेवूरकर, नरसिंह मिसालोलू, रामचंद्र वग्गे, सिद्राम बगले आदी उपस्थित होते.
Post Views: 11