सोलापूर – कुमठे येथील लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला असून विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत नरेंद्र सतीश चव्हाण यांनी ९३.२० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. पूर्वा विरभद्र धुम्मा यांनी ७३.८० % गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर अभी सुरेश रत्नाकर यांनी ७२.२०% गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशाबद्दल मुख्याध्यापिका शुभांगी पवार तसेच शाळा समन्वयक मलकारी कोरे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेचे विश्वस्त जयकुमार माने तसेच प्रमुख स्वातीताई माने यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशासाठी परिश्रम घेणारे वर्गशिक्षक सतीश चव्हाण, अनघा कौजलगी, शशिकला मंगरूळे, अक्षय जमादार, कावेरी वाले तसेच नीलम्मा खेड यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करण्यात आले.
या उल्लेखनीय यशामुळे परिसरात शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून पालकांकडून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


























