सांगोला – नाझरे (ता.सांगोला) येथील हिंदू संमेलनात डॉ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामी यांनी हनुमानाचे महत्त्व सांगत ज्या मंदिरात आपण जातो त्या देवाची प्रथम आरती व नंतर हनुमंताची घ्या असे सांगितले होते. त्याप्रमाणे नाझरे येथील मारुती मंदिरात सध्या तुकाराम चरित्र या पोथीचे वाचन सुरू असून त्याची महाआरती लक्ष्मी पाटील यांच्या शुभहस्ते तर महाबली हनुमानाची महाआरती रविराज शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी भारत शेलके, पोपटराव स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.हरिश्चंद्र सोनवणे यांनी महाप्रसादाचे वाटप केले. दर शनिवारी सायंकाळी आठ वाजता महाआरती कायमस्वरूपी होईल असे हनुमान भक्तांतर्फे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

















