वेळापूर – ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आज ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनाचे औचित्य साधून सरपंच रजनीश बनसोडे यांनी झेंडावंदनाचा मान ग्रामपंचायत कर्मचारी धनाजी धांडोरे यांना दिला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. मीनाक्षीताई सरतापे, उपसरपंच नानासो मुंगुस्कर, ग्रामपंचायत अधिकारी कैलास सुरवसे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अमृतराव माने, देशमुख, शिवाजी पनासे पाटील, रविराज गायकवाड, प्रियंका आडत, सीमा खाडे तसेच रायचंद खाडे, रहीम मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि कामगारांच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमातून एकात्मता, कर्तव्यभावना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.


























