सोलापूर : ज्ञान हे कणकणाने मिळते. ज्ञान मिळविण्यासाठी परीश्रम करावे लागतात. भारतीय ज्ञान परंपरेत श्रमाला स्थान नव्हते, इतकेच काय मानवी स्वातंत्र्यालाही स्थान नव्हते. 19 व्या शतकात जन्माला आलेल्या ब्राम्हो, आर्य आणि प्रार्थना समाजाने नवी ज्ञान मांडणी केली असली तरी ती सुद्धा अद्वयेतवादावर आधारित मांडणी होती. देशात प्रथमच श्रमाआधारित व मानवहित असलेल्या ज्ञानाची मांडणी महात्मा फुले यांनी केली, असे प्रतिपादन “जेएनयू” चे प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी केले.
महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी समिती सोलापूर यांच्या वतीने आयोजीत केलेल्या तिसऱ्या प्रबोधन पर्वात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी “जिव्हाळा” चे आण्णाराव राजमाने होते. यावेळी मंचावर म. फुले जन्म द्विशताब्दी समितीचे अध्यक्ष प्रा. नरेश बदनोरे, कार्याध्यक्ष शंकर पाटील, सचिव ॲड. मनीष गडदे, प्रा. एम आर कांबळे, ॲड. गोविंद पाटील प्रा. डॉ. प्रदीप जगताप यांची प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना बाविस्कर म्हणाले की, रेनेसॉ किंवा प्रबोधन ही परंपरा फक्त बंगाल आणि महाराष्ट्रातच आहे. आता बंगालही रेनेसॉ पासून दूर गेला असला तरी महाराष्ट्र मात्र आजही प्रबोधनाच्या वाटेवर टिकून आहे. याला कारण महात्मा फुले हेच आहेत. इथल्या पारंपरिक अभ्यासकानी तत्वज्ञ म्हणून स्वीकारलेच नाही. तत्वज्ञ समांतर काळातील वस्तुस्थिति मांडली. समाजातील त्याकाळच्या सनातन्यांच्या शक्ति स्थळावर प्रहार केले. ती ही निडरपने. शिवाय वर्तमान समाजातील दोष दूर करण्याचे उपाय सांगितले. आणि तीसरे महत्वाचे म्हणजे समाजातील मानवी प्रतिष्ठेला महत्वाचे माणून बरोबर 24 सप्टेंबर 1873 म्हणजे आजच्या बरोबर 153 वर्षापूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. म्हणून महात्मा फुले हे तत्वज्ञ म्हणून आपले स्थान मजबूत करतात. असेही ते म्हणाले.
प्रारंभी स्नेहल पाटिल यांनी अखंड गायन केले. त्यानंतर रत्नाकर महाजन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले. प्रा. प्रदीप जगताप यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अंबुबाई दाभोळकर फेलोशिप मिळाल्याबद्दल सरफराज अहमद यांचा सत्कार करण्यात आला. आण्णाराव राजमाने यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिला हावळे यांनी केले तर आभार किशोर जाधव यांनी मानले.