अक्कलकोट – औसेकर महाराज परिवारास मातृशोक झाला असून श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसाचे विद्यमान पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर, व पंढरपुर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मातोश्री स्व.श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना हैदराबाद येथे त्यांच्या आशीर्वाद निवासस्थानी नुकतच देवाज्ञा झाली. रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता औसा येथील पाराबाई येथे भावपूर्ण साश्रू नयनाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. औसेकर कुटुंबीयांवर आलेल्या या दुःखद प्रसंगी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे मालक यांनी आज औसा येथे औसेकर महाराजांच्या मठास भेट देऊन श्री गुरुबाबा महाराज औसेकर, व ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे सांत्वन केले. यावेळी नगरसेवक महेश इंगळे यांनी शोकाकुल औसेकर परिवाराची भेट घेऊन धीर दिला व या दुःखात आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी नगरसेवक महेश मालक इंगळे यांचे सहकारी उद्योगपती दत्तकुमार साखरे, डॉ.राजू मलंग, अंकूश केत, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, श्रीशैल गवंडी आदींसह मोठ्या संख्येने औसेकर महाराज भाविक, शिष्य परिवार उपस्थित होता. स्व.श्रीमती लिलाबाई आईसाहेब यांच्या पश्चात ह.भ.प.गोरखनाथ महाराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष
ह.भ.प.सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, बसवंतराव देशमुख चिडगोपा हे तीन सुपुत्र, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे. आईसाहेबांच्या जाण्याने औसेकर महाराज परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संस्थांचे लाखो शिष्य शोक सागरात बुडाला आहे.
फोटो ओळ – श्री गुरुबाबा महाराज औसेकर, व ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांची औसा येथील मठात भेट घेऊन सांत्वन करताना नगरसेवक व चेअरमन महेश मालक इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर, दत्तकुमार साखरे, राजू मलंग, अंकुश केत, बाळासाहेब एकबोटे व अन्य दिसत आहेत.
Post Views: 18