Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फडणवीसांना मलिक चालत नाहीत, पण पटेल ‘पटतात’, अजितदादांनी सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडू नये; काँग्रेस नेत्याचा सल्ला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 9, 2023
in political
0
फडणवीसांना मलिक चालत नाहीत, पण पटेल ‘पटतात’, अजितदादांनी सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडू नये; काँग्रेस नेत्याचा सल्ला
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 नवाब मलिक हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहात सत्ताधारी गटातील बाकांवर बसले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहून मलिकांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध केला.

 

 

दाऊदच्या सहकाऱ्याशी आर्थिक व्यवहार केल्याच्या कारणावरुन तुरुंगवास भोगून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला होता. यासंदर्भात फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून आपली भूमिका परखडपणे मांडली होती. त्यानंतर अजित पवार यांनीही काहीशी सावध भूमिका घेत नवाब मलिक हे आमच्या गटात आहेत किंवा नाहीत, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यावरच मी बोलेन, असा पवित्रा अजित पवारांनी घेतला होता. त्यानंतर विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांचा भूतकाळ खणून काढत सरकारला पुन्हा कोंडीत पकडले होते. नवाब मलिक यांच्याप्रमाणेच प्रफुल्ल पटेल यांच्यावरही दाऊदच्या सहकाऱ्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. मग देवेंद्र फडणवीस नवाब मलिक आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत वेगवेगळी भूमिका का घेतात, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता.

 

हाच मुद्दा पकडत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केले आहे. तसेच अजित पवार यांना आपल्या सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडू नका, असा सल्ला दिला आहे. नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवण्याचे कारण त्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली हा आरोप व तपास यंत्रणांकडून चौकशी. प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी संबंधित मालमत्ता घेतली – इडीने ती ताब्यात घेतली तरी भाजपाला चालते पण नवाब मलिक चालत नाहीत. इतकेच काय? RKW डेव्हलपर्स लिमिटेड आणि सनब्लिंक रिअल इस्टेट या कंपन्यांची ED द्वारे टेरर फंडिंग तसेच इक्बाल मिर्चीशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे. भाजपाने या कंपन्यांकडून ₹२० कोटी देणगी घेतली तेही चालते. आता भाजपा नेते भाजपा अध्यक्षांना पत्र कधी लिहिणार?, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला. तसेच अजितदादांनी आपल्या सहकाऱ्याला भाजपाच्या दबावात वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नवाब मलिकांबद्दलची भूमिका योग्य आहे का? यावर अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी. उगीच उत्तर नाही म्हणून “एक मिनिट – एक मिनिट” करुन पत्रकारांना धमकावू नये, असा सल्ला सचिन सावंत यांनी अजितदादांना दिला आहे. यावर आता अजितदादा गट किंवा भाजपच्या गोटातून काही प्रतिक्रिया व्यक्त केली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

फडणवीसांच्या पत्रानंतर रोखठोक बोलणारे अजितदादा अडखळले

देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरबॉम्बनंतर एरवी कोणत्याही गोष्टीवर रोखठोक बोलणारे अजित पवार मलिकांच्या मुद्द्यावरुन बचावात्मक पवित्रा घेताना दिसले होते. नवाब मलिका यांच्याविषयी प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे अजित पवार प्रसारमाध्यमांवर चांगलेच संतापले. फडणवीसांच्या पत्राचं काय करायचं ते मी बघून घेईन. त्याबाबत मीडियाला उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे अजित पवार यांनी म्हटले होते. या सगळ्या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दु:ख व्यक्त केले होते. प्रशासनावर पकड असलेले, कार्यक्षम, स्पष्टवक्ते, रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळख असलेले नेतृत्व आज स्वतःच्याच सहकाऱ्याची बाजू मांडताना अडखळत आहे, हे बघून अत्यंत वाईट वाटतं. भाजपला केवळ सांगकामे नेतृत्व आवडतं. स्वयंभू नेतृत्व त्यांना नको असतं म्हणूनच त्यांच्याकडून लोकनेते संपवले जातात. आता वैचारिक मतभेद असले तरी एक क्षमता असलेला लोकनेता भाजपच्या रणनीतीचा शिकार होत आहे, याचं दुःख सर्व सहकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही नक्कीच आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली होती.

Post Views: 99
Previous Post

पुण्याची पसंत मोरे वसंत, कसबा पेठेत मनसेची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या दौऱ्याआधी वातावरण तापलं

Next Post

रणबीरसोबत हिट झालेली तृप्ती डिमरी कोण?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रणबीरसोबत हिट झालेली तृप्ती डिमरी कोण?

रणबीरसोबत हिट झालेली तृप्ती डिमरी कोण?

ताज्या बातम्या

हक्काच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना व्हावे लागले अर्धनग्न

June 4, 2026

आंदोलनाची वेगळी स्टाईल थेट टाकले दंडवत

June 4, 2026

पेट्रोल डिझेल खर्चाचा फटका असाही #marathinews #news

June 4, 2026

मराठा आरक्षण मोठी अपडेट #viral #news #marathinews

June 4, 2026

पंकजा मुंढेचा सैराट अंदाज …… स्वतः चालवला ट्रॅक्टर #marathinews #news #viral

June 4, 2026

आता जागा झाला मणियार……. #marathinews #news

June 4, 2026

भारीच ….पाहिले आहे का असे स्वागत?? #viral #news #marathinews

June 4, 2026

महागात पडले वृक्षतोड हजारे पाटील यांना एक कोटी १८ लाखांचा दंड

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893161

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697