मंगळवेढा – मंगळवेढा – मरवडे मार्गावर भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकी ला पाठीमागून जाेरात दिलेल्या धडकेत आसबेवाडीतील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 4.30 वाजता घडली आसुन चालक माेहमंद कबरूद्दिन (रा.झारखंड) याच्याविरूध्द गून्हा दाखल झाला आहे.
या अपघाताची फिर्याद तानाजी मोरे (रा.आसबेवाडी) यानी दिली असून यामध्ये म्हटले आहे की नारायण रतीलाल आसबे वय 35 व उमेश गमन खटकाळे वय 38 हे मंगळवेढ्यातील आपले कामकाज उरकून बजाज कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच 13 डी जी 119 वरून आसबेवाडी गावाकडे जात असताना मंगळवेढ्यापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मी देवी मंदिराजवळ पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या एम एच 04 जेके 1401 या सहा चाकी ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन नारायण आसबे याचा जागीच ठार झाला तर उमेश खटकाळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी ट्रक चालक मोहम्मद मकरूद्दीन मोहम्मद साबीरुद्दीन रा. घुगुलिया पोस्ट टाटीदरभंगा हजारीबाग झारखंड याच्यावर भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.आधिक तपास पाेलीस करीत आहेत



















