सोलापूर – जागतिक प्रेस दिनाचे औचित्य साधून मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊनच्या सोलापूर शाखेतर्फे दैनिक तरुण भारतचे मुख्य समूह संपादक दिलीप पेठे यांच्यासह पत्रकार व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मंचच्या अध्यक्षा निशा प्रमोद होलाणी, सचिवा सपना नवल काबरा व कोषाध्यक्षा उर्मिला मधुसुदन बलदवा यांच्यासह अन्य सदस्यांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात येऊन सर्वांचा यथोचित सत्कार केला.
दैनिक तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार संगवे, मुख्य वरिष्ठ उपसंपादक श्रीनिवास गाजूल, उपसंपादक विकास चाटी, डीटीपी ऑपरेटर्स मयुरा तारे, आनंद उपरे, जावेदबाशा जमादार, प्रिसिजन प्रिंटर्सचे सिध्दाराम चिट्टे आदींचा सत्कार करण्यात आला.























