सोलापूर – तरुण पिढीचे भवितव्य हे त्यांच्यावर झालेल्या संस्काराचे फलित असते.देश,देव,समाज यांच्याप्रती जाणीव ठेवून काम केल्यास समाजाची प्रगती होते.समाज ऋण फेडण्याची व्रुत्ती विद्यार्थ्यांनी ठेवावी.असे आवाहन सोलापूर जि.प.क्रुषी विभाग सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी वीरशैव सेवा मंडळ पूर्व विभाग, सोलापूर आयोजित गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभात केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरु यल्लालिंग महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रभाकर हंजगे यांनी केले.व संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी नगरसेवक शिवानंद पाटील, व भाजपा युवा आघाडी अध्यक्ष महेश बिराजदार यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवकर्णी पाटील यानी केले.आभार प्रदर्शन श्रीशैल शिळ्ळे यांनी केले
कार्यक्रमासाठी प्रकाश लोणी,विरुपाक्ष घेरडे, शिवराज चडचणकर, श्रीशैलट शिळ्ळे. अरविंद लोणी,यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास काशिनाथ रुगे,संगमेश्वर पायमल्ले, सुरेश चिक्कळी, विजयकुमार हुल्ले, शंकर पावरगी,विश्वनाथ मेरकर, राजशेखर मळेवाडी, वसंतराव परांडकर आदि मान्यवर उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली
Post Views: 17