सोलापूर – प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या मागणीचा विचार करून, मध्य रेल्वेने CSMT मुंबई-लातूर आणि CSMT मुंबई-बिदर एक्सप्रेस गाड्यांमध्ये ३ अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या गाड्यांची एकूण डब्यांची संख्या २४ होईल.
यामध्ये CSMT मुंबई-लातूर एक्सप्रेस दि. २५.०६.२०२६ पासून, लातूर-CSMT मुंबई एक्सप्रेस दि. २६.०६.२०२६ पासून, CSMT मुंबई-बिदर एक्सप्रेस दि. २६.०६.२०२६ पासून, बिदर-CSMT मुंबई एक्सप्रेस दि. २७.०६.२०२६ पासून धावेल.
सुधारित डब्यांच्या रचनेत २४ ICF डबे, ज्यामध्ये १ फर्स्ट एसी (First AC), ३ एसी टू-टायर (AC II-Tier), ५ एसी थ्री-टायर (AC III-Tier), ९ स्लीपर क्लास, ४ सामान्य द्वितीय श्रेणी (General Second Class) आणि २ गार्ड-कम-ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे.
या बदलामुळे मुंबई, लातूर आणि बिदर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आसनक्षमता, उत्तम सुविधा आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल. ३ अतिरिक्त डब्यांमुळे प्रवाशांसाठी १८२ अतिरिक्त जागा उपलब्ध होतील. यामध्ये १ एसी टू-टायर (AC II-Tier) – ४६ जागा, १ एसी थ्री-टायर (AC III-Tier) – ६४ जागा, १ स्लीपर क्लास – ७२ जागा उपलब्ध असतील.



















