सोलापूर : पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या चार वर्षांच्या सामाजिक कार्याचा अहवाल महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी संघाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, कार्यालय आणि वधू-वर सूचक केंद्रासाठी जुन्या घरकुल परिसरात महापालिकेकडून हॉल उपलब्ध करून देण्याची घोषणा महापौरांनी केली.
महापौरांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमाला नगरसेवक प्रथमेश कोठे, डॉ. अजय पोन्नम, सत्यनारायण गुर्रम, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष काशिनाथ गड्डम यांची प्रमुख उपस्थिती होती.संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी स्वागत करून संघाच्या स्थापनेपासून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, पूरग्रस्तांना मदत, वैद्यकीय शिबिरे, मतदार जनजागृतीसह ४८ विविध उपक्रमांचा चार वर्षांचा अहवाल यावेळी प्रकाशित करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्यामुळे आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे समाजसेवेची संधी मिळाल्याचे सांगितले. संघासाठी कार्यालय, वधू-वर केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी जुन्या घरकुल परिसरातील हॉल उपलब्ध करून देत असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच संघाच्या सामाजिक कार्याचा गौरव करत अहवालाचे कौतुक केले.
कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी, कार्याध्यक्ष सुरेश श्रीराम, सहसचिव सत्यनारायण बरदेपूर, खजिनदार उमापती मिठ्ठापल्ली, अंबादास इंदापुरे, श्रीनिवास वल्लाकाटी, अनिलकुमार जन्यारम, संगीता इंदापुरे, अरुणा कन्ना, वरलक्ष्मी गोटीपामूल, प्रमिला वडीशेरला, सुरेखा गोली, नागनाथ संभारम, नागनाथ वड्डेपल्ली, शाम बेनगिरी, वैकुंठम जडल, लक्ष्मीकांत दंडी, विजयकुमार चाटला यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी केले, तर सचिव यशवंत इंदापुरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
—
Post Views: 12