शहरातील पंचवटी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नागेश रणशुभे यांची तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश जिरोबे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड प्रक्रिया संस्थेचे मार्गदर्शक तथा सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी डी. जी. सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदा साठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. निवडीनंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पतंगे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन संचालक संतोष चवरे , नागनाथ पुठ्ठा, बाळू गोने,राजेंद्र लोहार,नागनाथ शिवशिंगवाले, अब्बासली जामदार,अनुसया सरोदे,सुलोचना भाकरे व संस्थेचे सीईओ ओंकार पतंगे, मॅनेजर नितीन एकबोटे अधिकारी अनिल कन्ना, मंदार मेंढापुरे,मीनाक्षी केंची यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 5