पंढरपूर – पं.विकास कशाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पं.विकास कशाळकर फाऊंडेशन पंढरपूर यांचे वतीने मंगळवारी (दि. ५ मे) ५:३० वाजता आरती मंडप प्रांगण भक्तीमार्ग श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पं.विकास कशाळकर यांचा सत्कार माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने भारतातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम गायक पद्मश्री पं.उल्हासजी कशाळकर यांचे शास्त्रीय गायन आयोजित करण्यात आले असून त्यांना तबला साथसंगत पद्मश्री तालयोगी पं.सुरेशजी तळवलकर हार्मोनियम डॉ.प्रवीण कासलीकर करणार असून पंढरपूर मधील अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील असून २०११ सालापासून अनेक संगीत मैफिली आयोजित करण्यात आलेल्या असून आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम गायक आणि गायिका यांच्या सुरेल मैफिली आणि नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
तरी या सुंदर संगीत मैफिलीला पंढरपूर व पंचक्रोशीतील सर्व कलासाधक, कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्ष डॉ प्रसाद कुलकर्णी सचिव ज्ञानेश्वर दुधाणे तसेच उपाध्यक्ष उदय उत्पात, सदस्य एस.पी.कुलकर्णी, राजेश खिस्ते, आण्णासाहेब सुरवसे,धनंजय मनमाडकर,माधूरी जोशी, स्वानंदी काणे,प्रज्ञा कुलकर्णी यांनी केले आहे.सदरहु कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

























