जालना – इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन केंद्र तसेच
विज्ञान भारती यांच्या वतीने जालना जिल्ह्यातील सुजाण पालक तसेच
विद्यार्थ्यांना इस्त्रोने केलेल्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या संशोधनाची
माहिती व्हावी म्हणून प्रथमच एक स्वतंत्र विज्ञान वाहिनी शहरातील
मुक्तेश्वर हिरवळीवर दाखल झालेली आहे.

इस्त्रोच्या स्पेस ऑन व्हील्स
उपक्रमास शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालय यासह जुन्या जालन्यातील
बारा शाळा,आणि गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
अनेक महत्त्वाच्या आणि देशाच्या दृष्टीने लक्षणीय ठरलेल्या उपक्रमाची
माहिती ‘स्वयंसेवकांनी’ विद्यार्थ्यांना दिली.विद्यार्थी माहिती जाणून
अक्षरशःभारावले होते.या प्रदर्शनाची आकर्षण म्हणजे भारताची
महत्त्वाकांक्षी गगनयान, चंद्रयान,भारतीय अंतरिक्ष केंद्र यांच्या
प्रतिकृती मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे
त्याच प्रमाणे विविध उपग्रहाची माहिती ध्वनिफितीच्या माध्यमातून
इस्त्रोच्या कामाचा आढावा विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. विज्ञान भारतीचे
श्रीपाद कुलकर्णी,अमोल कुंभलकर, सुरेश कुलकर्णी यांनी विविध शाळेतील
विद्यार्थ्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती दिली. विज्ञान वाहिनीतर्फे
प्रथम स्वयंसेवकांना माहिती देऊन याच विद्यार्थ्यांनी शहरातील हजारो
विद्यार्थ्यांना माहिती दिली.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.


















