पंढरपूर – पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाकडून ‘बोधचिन्ह’ अर्थात लोगोसाठी राज्यातील तरुणांना, युवकांना आवाहन करण्यात आले होते. या मध्ये पंढरपूर येथील पियुष कुमार पिंपळनेरकर यातरुणाने बाजी मारीत तृतीय क्रमांक पटकाविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्तेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीसुनेत्रा पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन आदी मंत्री उपस्थित होते.
पुढील वर्षी नाशिक व त्र्यंबकेश्वरयेथे कुंभमेळा भरत आहे. यानिमित्त राज्य शासनाकडून विविध योजना, विकास कामेसुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी त्रिंबकेश्वर येथे ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी (ता.१३) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्हासाठी राज्यातील तरुणांना आवाहन करण्यात आले होते. सुमारे ३ हजार तरुणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. दरम्यान पंढरपूर
येथील युवक पियुष कुमार पिंपळनेरच्या लोगोला तिसरा क्रमांकमिळाला. यानिमित्त त्यास राज्य शासनातर्फे १ लाख रुपये बक्षीस व सन्मानचिन्ह देऊनसन्मानित करण्यात आले.
पंढरपूर येथील पियुष पिंपळनेरकर यांनीहिंदू धर्माला अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टीचा समावेश या ‘बोधचिन्हा’ मध्ये केलाहोता. या स्पर्धेत तब्बल तीन हजार स्पर्धक सहभागीझालेले होते. या तीन हजार स्पर्धेकांमधून पियुष याने बाजी मारीत पंढरीचा नावलौकीक वाढविला आहे.या स्पर्धेत पियुष कुमारपिंपळनेकर याला तिसऱ्या क्रमांकाचे सुमारेएक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.


























