सांगोला – फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, सांगोला येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पालक प्रतिनिधी रंगनाथ चौगुले, आरती सरवळे यांच्या उपस्थितीत पालकांचे विभागप्रमुख प्रा.महेश वाळूजकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकातून प्रा.गणेश शिंदे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रा.महेश वाळूजकर यांनी शैक्षणिक आढावा सादर करत महाविद्यालयाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. याप्रसंगी उन्हाळी व चाचणी परीक्षेत तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी या विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.