Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चंद्रभागेचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी केवळ शासन,पालिका आणिमंदिर समितीची नाही तर ती सर्वांचीच

तरुण भारतbyतरुण भारत
June 2, 2026
in west maharashtra
0
चंद्रभागेचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी केवळ शासन,पालिका आणिमंदिर समितीची नाही तर ती सर्वांचीच
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – जेव्हा नव्हते चराचरा, तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हतीगोदा,गंगा, तेव्हा होती चंद्रभागा..अर्थात
तिर्थक्षेत्र पंढरपूर आणि येथील माता चंद्रभागेचे अस्तित्वसंतमाहात्मांनी हजारो वर्षापूर्वी आपल्या अभंगातून अधोरिखीत करुन ठेवले आहे. जेव्हा चराचर नव्हते तेव्हा तिर्थक्षेत्र पंढरपूर अस्तित्वात होते. या बरोबरच जेव्हा गोदा,गंगा या सारख्या मोठ्या नद्या प्रवाहित नव्हता त्या अगोदर पासून पंढरपूरात चंद्रभागानदी पंढरपूरात प्रवाहित होती. त्यामुळे या पवित्र चंद्रभागेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी केवळ शासनाची, मंदिर समितीची आणि पालिकेची नाही तर ती सर्वांचीच आहे. त्यामुळेच सर्वसामान्यभाविकांनी आपल्या पंढरपूरातील वास्तव्यात सैदेव जागरुकता दाखवून चंद्रभागेचे पावित्र्य जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर आणि तरच पवित्र चंद्रभागा नदी निखळ,निरंतर आणि खळखळून प्रवाहित राहु शकणार किंवा वाहू शकणार आहे.

दर तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास सध्या सुरु झालेला आहे. अधिकमास सुरु होवून साधारणपणे १२ ते १५ दिवस होत आलेले आहेत. या काळात अधिक मासाच्या प्रत्येकदिवशी भाविकांची गर्दी वाढत चाललेली दिसत आहे. साधारणपणे अजून देखील अधिक मासाचे शेवटचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यामुळे या काळात देखील गर्दीचे उच्चांक होणार आहेत.

साधारणपणे येथे आलेला भाविक प्रथम चंद्रभागा स्नान करतो. त्यानंतर विठुरायाच्या दर्शनाला जात असतो. अनेक भाविक चंद्रभागेच्या वाळवंटात थोडाफार विसावा देखील घेत असतात. चंद्रभागा स्नान, हरिपाठ तसेच नित्यक्रम पुजापाठा नंतर गावाकडून बरोबर आणलेल्या शिदोऱ्या देखील चंद्रभागेच्या वाळवंटातच भाविकांकडून सोडल्या जातात. आधी पोटोबा,मग विठोबाहे सवडीचे व्रत आचरणात आणून मस्तपैकी त्याफस्त करुन भाविक पंढरीतील नगरप्रदक्षिणा, देवाचे पदस्पर्श किंवा मुखदर्शन. अगदी फारचघाईगडबड असेल तर नामदेवपायरीचे दर्शन किंवा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कळस दर्शन करुन पंढरीचा मुक्काम संपुष्टात आणित पुन्हा परतीच्या प्रवासासाठी गावाची वाट धरीत असतात.

मात्र हे सर्व करीत असताना पवित्र चंद्रभागा नदीच्या तसेच तिच्याविर्स्तण पसरलेल्या वाळवंटाच्या पावित्र्याकडे मात्र भाविकांचे पुर्ण दुर्लक्ष होत असते. कारण भाविकांकडून वाळवंटात ( तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था असताना देखील) अनेक वेळा उघड्यावरच प्रातविर्धी उरकल्याचे दिसून येतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीपसरते. या बरोबरच गावाकडून येताना भाविकांकडून सर्रास घरातील निर्माल्य,देवदेवतांच्या भग्न अवस्थेतील मुर्ती, जुन्या फोटोफ्रेम, देवदेवतांची जुनी वस्त्रेपवित्र् चंद्रभागा नदी मध्ये सोडण्यासाठी खास आणली जातात. तसेच या ठिकाणी देखील चंद्रभागेला अर्पण करण्यासाठी भाविकांकडून (खास करुन महिला भाविकांकडून) दीपदान, चंद्रभागा नदीलाखणानारळाची ओटी असे विधी देखील सर्रास पार पाडले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे यासर्व प्रकारामुळे चंद्रभागा नदीपात्राचे पावित्र्य धोक्यात येते. पात्रात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसुन येते. त्यामुळे चंद्रभागा नदी, तिचे विस्तीर्ण वाळवंट अपवित्र किंवा घाण होण्याला खरोखरं जबाबदार कोण असा सवाल जर उपस्थित केला तर आपण सर्रास बोट दाखवितो ते शासन, नगरपालिका आणि मंदिर समितीकडे. मात्र येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाने आपल्या मनाला जर हा प्रश्न केला तर त्याचे उत्तर आपोआपच भाविकाला मिळू शकते. कारण खरोखर चंद्रभागानदीचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ही केवळ शासनाची, पालिकेची आणि मंदिर समितीची नाही. कारण त्यांच्याकडून केवळ स्वच्छेतेच्या व्यवस्था निर्माण केल्या जातात.

कारण जसा अधिक महिना सुरु झाला तेव्हा पासुन येथील नगरपालिका वारंवार नदीची,वाळवंटाची स्वच्छता करताना दिसून येते. मात्र येणाऱ्या भाविकांच्या मानाने ही यंत्रणा अतिशय तोकडी पडताना दिसू येते. कारण घाण करणाऱ्यांची संख्या लाखावर आणि स्वच्छकरणाऱ्या हातांची संख्या पन्नाश, शंभरावर ..   येथे येणाऱ्या भाविकांचा राबता पाहिला आणि त्यांच्याकडून कळत नकळतहोणाऱ्या घाणीचे प्रमाण पाहिले तर ते अतिशय जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे

प्रत्येकभाविकांनी स्वत:शी ठाम निश्चिय करुन आपल्या स्वत:च्या घरा प्रमाणेच पंढरीनगरी मध्येतसेच विशेषत: चंद्रभागा नदी, तिचे विस्तीर्ण वाळवंट स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केलातर आणि तरच चंद्रभागा नदीचे पावित्र्य खऱ्या अर्थाने जपले जाईल. माता चंद्रभागा खऱ्याअर्थाने नितळ, स्वच्छ आणि प्रवाहितपणे वाहू शकणार आहे. अन्यथा आपणच चंद्रभागेला अपवित्रकरण्यास जबाबदार असणार  आहोत. केवळ विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनाने आपल्या पदरात
पुण्य पडणार नाहीतर तिर्थक्षेत्र पंढरपूर, मंदिर परिसर, चंद्रभागा नदी आणि तिचे विर्स्तीर्ण वाळवंटांचीस्वच्छता तिचे पावित्र जपले तर आणि तरच आपल्या पदरात पुण्यफल पडणार आहे हे प्रत्येकभाविकाने मनाशी ठरविले पाहिजे.

Post Views: 235
Previous Post

ईगल्स व रायडर्स संघांचे थरारक विजय; ​ऋग्वेद पाटील आणि अथर्व हलकुरकी सामन्याचे मानकरी 

Next Post

‘​मॉडेल’चा नॅशनल अकॅडमीवर दणदणीत विजय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘​मॉडेल’चा नॅशनल अकॅडमीवर दणदणीत विजय

'​मॉडेल'चा नॅशनल अकॅडमीवर दणदणीत विजय

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1166839

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!