सोलापूर – न्यू लक्ष्मी चाळ, देगाव रोड, सोलापूर येथील नलवडे परिवाराने यंदा गौरी-गणेशोत्सव आरास एक अनोख्या पद्धतीने केली. महाराष्ट्र पोलीस दलाचे हे स्थापन झाल्यापासूनचे ६५ वे वर्ष अर्थात नील महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक लावण्यात आले. तसेच २६/११ हल्ल्यातील जीवाची बाजी लावुन अतिरेकी कसाबला पकडणारे शहीद तुकाराम ओंबाळे व शहीद अशोक कामटे यांची प्रतिमा व महाराष्ट्र पोलीस दलातील प्रथम महिला I.P.S. अधिकारी मीरा बोरवणकर यांचे ही फलक लावून लक्ष्म्यांसमोर आरास करण्यात आले.
” माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला ”
” ना कुठलं मंडळ आहे , ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता , जिथे लागला बंदोबस्त तिथेच सुखकर्ता दुःखहर्ता…….”
” महाराष्ट्र पोलीस दल स्थापनेच्या ६५ व्या अर्थात नील-महोत्सवी वर्षानिमित्त नलवडे – घुले परिवाराच्या वतीने समस्त पोलीस बांधवांना हार्दिक शुभेच्छा……..”
असे संदेश देण्यात आला. सदर आरास हर्षद नलवडे याने केवळ १२००/- रू. मध्ये तयार केले आहे.
यावेळी सोलापूर गुन्हे शाखेचे A C.P मनोज यादव ही आरास पाहुनी विशेष कौतुक केले. अरूणभाऊ घुले, लहु गायकवाड, बिरजू नलवडे, अप्पु बिराजदार, दयानंद गुंड, सुरज झांबरे, विलास कोकितकर, देविदास वाघमोडे, राजु पवार, शाम घाडगे आदी उपस्थित होते.


















