
कवी संतोष चिले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
सांगोला – सिंधुदुर्ग येथील कवी संतोष चिले यांना युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे यंदाचा युगंधरा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यमुकुटमणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. युगंधरा आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यवीर सावरकर काव्यलेखन स्पर्धेमध्ये संतोष चिले यांनी साकारलेल्या अद्वितीय काव्यनिर्मितीबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. यापूर्वीही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६ व दादासाहेब राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या आंतरराष्ट्रीय पातळीवरील गौरवाबद्दल महाराष्ट्र आणि गोव्यातील साहित्य वर्तुळातून संतोष चिले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 4