सोलापूर – मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी व प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी ग्रुप परिसरातील अवैद्य धंदे विरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. मंद्रूप परिसरातील अवैद्य दारू, मठका , जुगार अड्ड्यावर
यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रात्री टाकळी रस्त्यावरील बगले यांच्या शेतामध्ये तीन पानी जुगार खेळत असल्याचे
माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्री साडेसात वाजता पोलिसां मार्फत जुगार खेळणाऱ्यावर धाड टाकली. त्यामध्ये मोटरसायकल रोख रक्कम व मोबाईल्स असे एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये रोहन रमेश चौगुले_ बरुर, सिद्धू तोडीकट्टी_ टाकळी , राजकुमार लक्ष्मण सगाई _ टाकळी , महेश भीमाशंकर तांडोरे _ बोळकवठा, गुंडुराव बंडू पोद्दार _ हत्तरसंग , सुभाष सिद्धाराम कुंभार _ टाकळी , उमेश इरगोंडा बिराजदार _ टाकळी, बसवराज _ टाकळी, लक्ष्मण सिद्राम वंजारी_ टाकळी , राजशेखर गायकवाड _ हत्तरसंग , रवी बगले _ टाकळी , शिवानंद लक्ष्मण घोडके _ टाकळी, सचिन मेढेदार _ टाकळी हे पोलिसांना बघून पळून गेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे .पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे तपास करीत आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















