Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माढ्यात राजकीय घडामोडींना वेग, शिंदे विरुद्ध साठे लढत होणार?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 18, 2024
in solapur
0
माढ्यात राजकीय घडामोडींना वेग, शिंदे विरुद्ध साठे लढत होणार?
0
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभानिवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आता पुढच्या काही महिन्यांमध्येच राज्यात विधानसभा निवडणुकीचा संग्राम सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत राज्यात चर्चेचा विषय ठरणारा माढा लोकसभा मतदारसंघ विधानसभेच्या निवडणुकीत देखील चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कारण या विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुन माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतलीय. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या माढ्यात बबनदादा शिंदे  हे विद्यमान आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळं माढ्यात रणजितसिंह शिंदे विरुद्ध मिनल साठे असा सामना होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. मिनल साठे यांनी सांगलीत जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. पण ही भेट सदिच्छ भेट होती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिनल साठे यांनी दिली. मात्र, या भेटीमागे विविध राजकीय तर्क काढले जात आहेत. माढ्यातील साठे कुटुंब हे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेलं कुटुंब मानलं जाते. मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत असल्यामुळं साठे कुटुंबाने भापमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पुन्हा त्यांनी घरवापसी केली आहे.

माढ्यात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना होणार?
सध्या माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिदे हेदेखील दररोज तालुक्यातील विविध गावांना गाठी भेटी देत आहेत. लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. तसेच मिनल साठे देखील गावोगावचे दौरे करत आहेत. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तिकीट सुटण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तिकीट सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिंदे विरुद्ध कोण? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. कारण माढा तालुक्यात साठे यांच्याशिवायत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांचे देखील अस्तित्व आहे. त्यांचे साखर कारखाने, बँका, शिक्षणसंस्था आहेत. ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. त्यामुळं ते कोणती भूमिका घेणार याकडं देखील सर्वाचं लक्ष आहे. तसेच शरद पवार गटात संजय पाटील घाटणेकर, संजय कोकोटे ह देखील सक्रिय आहे. त्यामुळं शिंदेच्या विरोधात कोण? असा सवाल उपस्थित केला जातोय.

आमदार बबनदादा शिंदे सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून
आमदार बबनदादा शिंदे यांचा माढा विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. सलग सहा वेळा ते माढा विधानसभेच्या निवडणुकीत निवडूण आले आहेत. साखर कारखाने, बँका, बाजार समित्या, जिल्ह्या दुध संघ यावर बबनदादा शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्याचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे सध्या सोलापूर जिल्हा दुध संघाचे चेअरमन आहेत. तसेच बबनादादा शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. त्यामुळं शिंदे कुटुंबियांचा माढा तालुक्यात मोठा संपर्क आहे.

मोहिते पाटलांच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीनंतर माढ्यात राजकीय समीकरणं बदलणार का? असा सवालही उपस्थिक केला जातोय. कारण लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर उभे होते. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मैदानात होते. या निवडणुकीत मोहिते पाटलांनी मोठ्या मताधिक्क्यानं निंबाळकरांचा पराभव केला होता. यामध्ये विशेष बाब म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटलांना 52000 मतांचा मताधिक्य मिळालं आहे. या मतदारसंघावर आमदार शिंदे यांचं वर्चस्व आहे. त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील कोणाला पाठिंबा देणार की, त्यांच्याच परिवारातील उमेदवार उभा करणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

अभिजीत पाटील काय भूमिका घेणार?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अभिजीत पाटील काय भूमिका घेणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. कारण, शरद पवारांचे खद्दे समर्थक म्हणून अभिजीत पाटील यांची ओळख होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी रणजितसिंह निंबाळकरांचे काम केले. राज्य सरकारनं त्यांच्या कारखान्याला अडचणीतून बाहेर आणण्याचे आश्वासन दिल्यामुळं त्यांनी लोकसभेला भाजपला मदत केली होती. मात्र, आता विधानसभेला ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, ते देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. सध्या माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. त्यामुळं पंढरपूर तालुक्यतील मते ही खूप महत्वाची ठरतात .अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील आहेत. त्यामुळं ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Post Views: 82
Previous Post

विधानसभेची रणधुमाळी, मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

Next Post

लक्ष्मण हाकेंची तब्येत बिघडली; डॉक्टरांकडून तपासणी, उपचारास नकार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
लक्ष्मण हाकेंची तब्येत बिघडली; डॉक्टरांकडून तपासणी, उपचारास नकार

लक्ष्मण हाकेंची तब्येत बिघडली; डॉक्टरांकडून तपासणी, उपचारास नकार

ताज्या बातम्या

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246357

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!