भोकर – शहीद प्रफुल्ल नगर भोकर येथील सामान्य कुटुंबातील कन्या कु .पुजा रामराव गुलेवाड यांची धुळे जिल्हा पोलीस दलात निवड झाल्याने नगरवासीयांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या .
शहीद प्रफुल्ल नगर येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेली वडील बांधकाम व्यवसायीक आई गृहीणी असतांनाही जिद्य आणि मेहनतीच्या बळावर अशक्य गोष्ट शक्य करता येते कु . पुजाने पाटील अकॅडमी किनवट येथे अभ्यासासह सराव करून यश संपादन केल्याने प्रफूल्ल नगरातील लोकांनी तीचा सत्कार केला.
या वेळी नगसेवक संजय घंटलवार , अकॅडमी प्रमुख संतोष पाटील , नगसेवक प्रतिनिधी विकास क्षिरसागर , मुख्याध्यापक बी. जी गाडे , संतोष शहा , सुनिले शहा , उदयकुमार सुर्यवंशी , नंदकुमार कुरुकवाड , पत्रकार अरुण डोईफोडे , बी . एस . सरोदे , संदीप नरवाडे यांनी शाल , पुष्पहार देऊन कु . पुजा गुलेवाड यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सुत्रसंचालन , आभार बी . एन .कांबळे यांनी मानले .


















