अकलूज – येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रत्नाई चषक राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत पाचशे पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होऊन स्पर्धेचा समारोप झाला.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त स्मृतीभवनच्या महर्षी हॉल येथे आयोजित केलेल्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपाध्यक्ष पोपट भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव,सर्व संचालक, राष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू अनन्या बाळापुरे, सरिस्का बावळे, सई बावळे, सार्थक राऊत, श्रीराम राऊत, ओम राऊत, विनय रणसुंबे, आर्यन माने देशमुख, विनीत रणसुंबे, आदिनाथ हवाले हे प्रमुख उपस्थितीत होते.
आपल्या प्रमूख भाषणात
कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांनी सहकार महर्षी काकासाहेबांना त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये मोठे पाठबळ व योगदान दिले. ही स्पर्धा आक्कासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करीत आहोत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे खेळाडूंनी सोने करावे. मागील २५ वर्षापासून या स्पर्धा सुरू आहे. मागील चार वर्षात अधिक खेळाडूंचा सहभाग स्पर्धेमध्ये होता. संख्येबरोबरच गुणवत्ता पूर्वक स्पर्धा हे मंडळाचे ध्येय आहे.
स्पर्धा प्रमुख अभिजीत बावळे यांनी प्रस्तावित केले. या स्पर्धेत ३० कॅश प्राईज, ६० ट्रॉफीज, ६० मेडल तसेच प्रत्येक गटात २० पेक्षा अधिक बक्षिसे देण्यात आली.
प्रथम क्रमांकास रु.१००१ रु, द्वितीय ८०१ रु, तृतीय ७०१ रु, चौथा ६०१ रु, पाचवा ५०१ रु, सहा ते दहा क्रमांकास सन्मानचिन्ह व अकरा ते वीस क्रमांकास मेडल अशी बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेतील गटनिहाय प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे
(१० वर्ष खुला गट) कृष्णराज पताळे, अजिंक्य कांबळे, जय राठी, हर्षवर्धन अरकल, शिवरत्न गोरे
(१० वर्ष माळशिरस तालुका गट)
स्मित काटकर, प्रणव भोसले, अभय जगताप, विक्रम भोसले,आरुष माने.
(१५ वर्ष खुला गट)
युवराज गायकवाड, विहान कोंगारी, राजवर्धन काळे, प्रणव मजगे, आयुष उपाडे,
(१५ वर्ष माळशिरस तालुका)
सार्थक राऊत, विनय रणसुंबे, अनन्या बाळापुरे, श्रीराम राऊत, सानवी वाघमोडे.
(खुला तालुकाबाह्य गट)
देवदत्त पटवर्धन, प्रसन्न जगदाळे, शौर्य साळुंखे, आदिराज म्हेत्रे, अभिराज पवार.
(खुला माळशिरस तालुका गट)
अनिरुद्ध गुरव, प्रतीक इंगळे, समाधान सूर्यवंशी, अनिल सोनवणे, ओम राऊत.
स्पर्धेचे पंच म्हणून उदय वगरे, विजय पंगुडवाले, प्रज्वल गोरे, नितीन अग्रवाल, अमर शिंदे, अनिता बाळापुरे, कर्णाक्षी जाधव, राहुल बोराटे, शिवशंकर पांढरे, मिलिंद माने देशमुख, प्रियंका पाटील यांनी काम पाहिले. निकाल वाचन किरण सूर्यवंशी व राजकुमार पाटील यांनी केले.
Post Views: 4