Friday, August 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
June 26, 2026
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड (PCL) ने औद्योगिक सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award 2026’ पटकावला आहे. Environmental, Social and Governance (ESG) या विभागातील Medium Enterprise Segment मध्ये कंपनीला ‘1st Runner-Up’ हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
देशातील ऑटोमोबाईल उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा गौरव करण्यासाठी The Times Group, Worldwide Media आणि ET NOW यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. कठोर तांत्रिक, व्यवस्थापन आणि कार्यपद्धतीच्या मूल्यमापनानंतर प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, 2024, 2025 आणि 2026 या सलग तीन वर्षांमध्ये ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ मिळविण्याची हॅट्रिक साधणाऱ्या मोजक्या भारतीय कंपन्यांमध्ये प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडने स्थान मिळवले आहे. या सातत्यपूर्ण यशामुळे औद्योगिक सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रातील उत्कृष्टतेची कंपनीची परंपरा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.
या उल्लेखनीय यशामागे कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, प्रभावी सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली तसेच सुरक्षा विभागासह सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण योगदान महत्त्वाचे ठरले आहे. सुरक्षित कार्यसंस्कृती, पर्यावरणीय जबाबदारी आणि शाश्वत विकासाच्या सर्वोच्च मानकांचे कंपनीने सातत्याने पालन केल्याची ही राष्ट्रीय स्तरावरील दखल मानली जात आहे.
पुणे येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडच्या वतीने सुहास पाटील (Senior Safety Manager), अमित पाटील (Senior Officer – Safety) आणि ऋषिकेश शिंदे (Environment Officer) यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
औद्योगिक सुरक्षेतील जागतिक दर्जाच्या कार्यपद्धती, पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन, शाश्वत विकासासाठीची बांधिलकी, प्रभावी ESG व्यवस्थापन तसेच सातत्यपूर्ण सुधारणा यांचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
“सुरक्षा आणि पर्यावरणाचे रक्षण, हेच आपले कार्यव्रत” या ब्रीदवाक्याशी एकनिष्ठ राहून प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड भविष्यातही औद्योगिक सुरक्षा, गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेची नवी शिखरे गाठण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले.
*चौकट*
*”हा सन्मान संपूर्ण प्रिसिजन परिवाराचा”*
*याप्रसंगी कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा म्हणाले, “हा सन्मान कोणत्याही एका विभागाचा किंवा व्यक्तीचा नसून संपूर्ण प्रिसिजन परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचा, शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा आणि सुरक्षिततेप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचा गौरव आहे. कंपनीतील प्रत्येक कर्मचारी, अधिकारी आणि व्यवस्थापनाने सुरक्षा, गुणवत्ता आणि पर्यावरण संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य दिल्यामुळेच आम्हाला सलग तिसऱ्या वर्षी हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. भविष्यातही जागतिक दर्जाच्या मानकांचे पालन करत उत्कृष्टतेची ही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”*
Post Views: 82
Previous Post

महापारेषणच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती

Next Post

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिवच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिवच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिवच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी

ताज्या बातम्या

श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला निधी देऊ आ देवेंद्र कोठे यांनी दिला शब्द#solapurnews

August 14, 2026

दैनिक तरुण भारत वर वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा झाला वर्षाव#news #solapur

August 14, 2026

श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला निधी देऊ आ देवेंद्र कोठे यांनी दिला शब्द #news#viral

August 14, 2026

सोलापुरात ‘हर घर तिरंगा’अभियान उत्साहाने संपन्नसर्वधर्म एकता मंचाकडून मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप #news

August 14, 2026

ऐतिहासिक क्षण लोकसभेत पहिल्यांदा संपूर्ण वंदे मातरम सादर #news #viral

August 14, 2026

राष्ट्रवादीचे उमेश पाटील व सुहास कदम यांच्यावर पाच कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा #news #viral

August 14, 2026

सोलापूरातून पद्मशाली बांधवांकडून पद्मावती देवीला जाणार माहेरची साडी #news #solapurnews #marathinews

August 14, 2026

कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद #news #solapurnews

August 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1062915

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!