बार्शी – श्री रणवीर राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शंभूराजे बहुउद्देशीय संस्था व श्री माऊली बिगर शेती पतसंस्था मर्यादित, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय एकदिवसीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत सोलापूर, पुणे, धाराशिव सह २५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या लढतीत ध्रुव पाटील याने ६.५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला व रुपये ५,०००/- रोख व चषकाचा मानकरी ठरला.
वयोगट निहाय विजेते पुढीलप्रमाणे- खुला गट- १) ध्रुव पाटील, २) सिद्धांत कोठारी, ३) श्रेयस कुदळे.
महिला गट विजेती- सान्वी गोरे. १७ वर्षाखालील- आदिराज म्हेत्रे. ५० वर्षांवरील- नंदकुमार सुरु. १३ वर्षाखालील- पृथा ठोंबरे. ११ वर्षाखालील- विहान कोंगारी. ९ वर्षाखालील- नमन रंगरेज. ७ वर्षाखालील- लखित काबरा.
स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून राष्ट्रीय पंच उदय वगरे यांनी काम पाहिले. त्यांना विजय पांगुडवाले, रोहिणी तुम्मा, अभिजीत बावळे, सारिका बावळे प्रज्वल कोरे, विद्याधर जगदाळे यांनी सहकार्य केले.
बक्षीस वितरण समारंभ श्री माऊली पतसंस्थेचे चेअरमन वशिष्ठ गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेश वाणी, तालुकाध्यक्ष सचिन देशमुख, सोमनाथ पांडेकर, किरण मिरगणे, विश्वास बारंगुळे, दत्ता पाटील, धनाजी लोखंडे, दत्तात्रय गोरे, नेताजी सांगुळे, अतुल नलगे, रामेश्वर रोकडे, चेस क्लबचे डॉ. चंद्रकांत उलभगत, विद्याधर जगदाळे, शंकर साळुंकै,निलकंठ ठोंबरे , कृष्णा गोरे, भगवान गोरे, समाधान गोरे, सागर पालके आदी उपस्थित होते.
सर्व विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळासाहेब चव्हाण यांनी केले.