सोलापूर – प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि शासकीय कामकाज जनतेसाठी खुले करणे. तसेच नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढविणे हा कायदयाचा मुख्य उद्देश आहे, अर्जदाराने मागतिलेली माहिती 30 दिवसाच्या आत देणे अनिवार्य आहे. माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे, हे लक्षात ठेवून सहकार्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे, कार्यालयातील कामांचे स्वरूप, नियम, कर्मचाऱ्याचे अधिकार, योजनाची माहिती वेबसाईट वर अथवा सुचना फलकावर अद्यावत ठेवली पाहिजे असे प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी सांगितले.
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती अधिकारी दिन साजरा करण्यात आला . यावेळी
कार्यशाळा व प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यावेळी मनीषा वास्ते, गिरीषचंद्र वाघमारे, ज्योतीराम भोसले, सदाशीव कोळी, सुरेश राठोड, समीर शेख, मृणालीनी शिंदे, संदीप घोडके, शहानवाज शेख, बसवराज बिराजदार, रुपाली मोरे, स्नेहा जाधव, अंजली पाटील, आरती मैंदळकर, सुरेखा तोंडसे, मिलन बिराजदार, श्रीकांत माने, चंद्रकांत जगताप, अजीज सय्यद, महेश गायकवाड, मनोहर राठोड, दिपाली देंडे प्रज्वल कुर्ले यांनी सहभाग घेतला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















