सोलापूर : वाचन हे जीवनात प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सखुबाईच्या भूमिकेसाठी चरित्र वाचनाचा मोठा फायदा झाला, असे प्रतिपादन ‘सन मराठी’ वाहिनीवरील माझा सखा पांडुरंग या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री सान्वी जांभेकर यांनी नुकतीच ‘जागृती ॲडव्हान्स लायब्ररी’ला सदिच्छा भेटीप्रसंगी केले.
जागृती लायब्ररीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या सत्कार प्रसंगी बोलताना सान्वी जांभेकर यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. मी साकारलेल्या ‘सखुबाई’ या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी मला चरित्राचे सखोल वाचन करावे लागले. वाचनामुळे विचारांना समृद्धता आणि व्यक्तिमत्त्वाला पैलू मिळतात.”
या विशेष प्रसंगी ‘जागृती ॲडव्हान्स लायब्ररी’चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, ‘मीडिया मास्टर’चे लेखक किरण बनसोडे, पत्रकार विजय गायकवाड, अली हैदर, साहिल सुर्वे, रोहन नंदाने , हाफिजा मुलाणी, पौर्णिमा भीमन्नवरू आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सान्वी जांभेकर यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
—-
Post Views: 11