वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली येथील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामधील विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवरांची निवड थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या पत्यावर ०१ जानेवारी २०२४ रोजी हजर रहायचे आहे.
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगलीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या (Computer Science and Engineering Department) मधील विविध जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
पदभरतीचा तपशील :
संस्था : वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली (Walchand College Of Engineering, Sangali)
भरली जाणारी पदे : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
नोकरी ठिकाण : सांगली
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखती विषयी :
मुलाखतीची तारीख : ०१ जानेवारी २०२४, सकाळी १० वाजल्यापासून
मुलाखतीचा पत्ता : वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगलीच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मुलाखतीला येणार्या उमेदवारांकडे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, DTE (GOM) आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी नमूद केल्यानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असावा.
मिळणारे एवढा पगार :
- प्राध्यापक : १,००,००० रुपयांपेक्षा अधिक
-
- सहयोगी प्राध्यापक : ७५,००० रुपयांपेक्षा अधिक
- सहाय्यक प्राध्यापक : ४०,००० रुपयांपेक्षा अधिक
अशी होईल निवड :
1. वरील रिक्त पदाच्या निवडी मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. उमेदवार १ जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.
4. मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA / DA दिला जाणार नाही.
महत्त्वाच्या लिंक्स :
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.