
सोलापूर – भोगाव तालुका उत्तर सोलापूर येथील ‘शंभूराजे प्रतिष्ठान’ आणि ‘न्यू श्री गणेश तरुण मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात आणि आदर्श पद्धतीने साजरी करण्यात आली. या निमित्ताने कोणत्याही राजकीय नेत्याला न बोलवता, समाजात पडद्यामागे राहून निस्वार्थ सेवा करणाऱ्या खऱ्या समाजसेवकाचा सन्मान करून जयंतीला एक वेगळी दिशा देण्यात आली.
सकाळच्या सत्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला तरुण वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, गावातील स्मशानभूमीत दररोज न चुकता झाडलोट करणारे, पाणी देणारे आणि झाडांचे संगोपन करून परिसर हिरवागार ठेवणाऱ्या निस्वार्थ गावतील संतोष गुड्डे दादाराव भोसले विजय बनसोडे दादा घोडके रामचंद्र सोमवंशी दत्ता खारे दत्ता सोमवंशी जाधव मामा श्रेषाल काळे आदी चा शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. “खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करणाऱ्या अशा देवमाणसांचा सत्कार करणे हीच छत्रपती संभाजी महाराजांना खरी आदरांजली आहे,” अशी भावना यावेळी शेखर भोसले यांनी व्यक्त केली.
या सोहळ्याचे यशस्वी नियोजन शंभूराजे प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष अजय बेळ्ळे, उपाध्यक्ष अभिजित गायकवाड, गावचे माजी उपसरपंच गोरख भोसले, माजी सरपंच महादेव वाघमारे आणि रेवन घोडके प्रामुख्याने उपस्थित होते.


















