वृद्ध इसमाचा मृत्यू  – मजुराची गळफासाने आत्महत्या – औषध पिलेल्या इसमाचा मृत्यू

हॉटेलमध्ये  चहा पिताना चक्कर येऊन पडल्याने वृद्ध इसमाचा मृत्यू 


सोलापूर – हॉटेलमध्ये चहा पीत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने एका 68 वर्षीय वृद्ध इसमाचा  मृत्यू झाल्याची घटना नई जिंदगी येथील हॉटेल मध्ये आज मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
     आप्पासाहेब मल्लप्पा तेरदाळे ( वय 68 वर्ष , रा .शिवगंगा नगर भाग 3 , नई जिंदगी , सोलापूर ) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे . ते आज मंगळवारी सकाळी अमन चौकातील अमन हॉटेलमध्ये चहा पीत होते . अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले व बेशुद्ध होऊन  पडले. दरम्यान मुलगा अजित याने त्यांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात दुपारी बारा वाजता दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा दुपारी तीन वाजता मृत्यू झाला.
संगमेश्वर नगर भागात वीट भट्टी मजुराची गळफासाने आत्महत्या
 
सोलापूर – अज्ञात कारणावरून वीट भट्टीवरील एका पस्तीस वर्षीय  मजुराने घरात लाकडीवाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एमआयडीसी येथील संगमेश्वर नगर मागे आज मंगळवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली .
     कल्याणी परमेश्वर गेजगे ( वय 35 वर्ष ,रा हेबळी , ता.आळंद , जी गुलबर्गा ,सध्या संगमेश्वर नगर मागे , सोलापूर ) असे मयत मजुराचे नाव आहे . तो वरील ठिकाणी चांद नदाफ यांच्या वीटभट्टीवर  कामास होता . आज मंगळवारी सकाळी सहा वाजता त्याच्या घरात त्याने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले .  ही खबर एमआयडीसी पोलिसांना समजली असता हवालदार घोडके यांनी घटनास्थळी पोहचून सदरचा मृतदेह इतरांच्या साह्याने खाली उतरून येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सकाळी आठ वाजता दाखल केला .
घरगुती भांडणात झुरळ मारण्याचे औषध पिलेल्या जुळे सोलापूर येथील इसमाचा अखेर मृत्यू
 
सोलापूर – घरगुती भांडणाच्या कारणावरून झुरळ मारण्याचे औषध पिलेल्या जुळे सोलापूर येथील एका इसमाचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी पहाटे चार वाजता मृत्यू झाला.
     निलेश अशोक शिंदे ( वय 43 वर्ष , 64, हेरिटेज , जुळे सोलापूर ) असे त्या मयत इसमाचे नाव आहे . 14 मे रोजी रात्री नऊ वाजता राहत्या घराजवळ घरगुती भांडणाच्या कारणावरून त्यांनी झुरळ मारण्याचे औषध पिले होते . यात चक्कर येऊन खाली पडल्याने त्यांना चेहऱ्यास जखम व सर्व अंगाला मुका मार लागला होता . त्यामुळे त्यांना सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान आज मंगळवारी पहाटे चार वाजता मृत्यू झाला .
Next Post

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...