Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा ७ ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 4, 2024
in top news
0
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा ७ ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा
0
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठाणे, 4 ऑगस्ट, (हिं.स.) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी, ७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. शनिवारी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजन समितीच्या वतीने प्रकाशन सोहळ्याबाबत माहिती देण्यात आली.

या पत्रकार परिषदेस प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर, चरित्रग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी संबोधित केले. यावेळी अन्य मान्यवर व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या माध्यमातून हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या चरित्रग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास आम्ही जवळून पाहिला असून आज ते राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत, याचा त्यांचा सहकारी म्हणून आनंद आहे. त्यांच्यावरील चरित्रपर ग्रंथाचे प्रकाशन ठाण्यात होत असून हा सोहळा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केला. तर या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे चोख नियोजन करण्यात आले असून हा सोहळा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न होईल, असे आमदार रवींद्र फाटक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथामागील, तसेच प्रकाशन सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. डॉ. उदय निरगुडकर यावेळी म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील, विशेषत: त्यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाच्या घटना, प्रसंग सामान्य जनतेला माहीत आहेत. परंतु राज्याच्या मुख्यमंत्री पदाला गवसणी घालणारे त्यांच्यातील नेतृत्व घडले कसे, त्यामागील पार्श्वभूमी काय होती, याविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्यातील नेतृत्वगुणांची जडणघडण कशी झाली, हे विविध घटना, प्रसंग आणि अनुभवी सहकाऱ्यांच्या मनोगतांतून उत्तमपणे मांडले आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिला मोठा नागरी सत्कार ठाण्यात झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या मुख्यमंत्री पदावरील कारकिर्दीचा कळसाध्याय सुरू असताना त्यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथाचे प्रकाशन ठाण्यातच होत आहे याचा आनंद आहे, असे प्रतिपादन डॉ. उदय निरगुडकर यांनी यावेळी केले. तर ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर यांनीदेखील याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. ग्रंथाली प्रकाशनाने आजवर अनेक दिग्गज राजकीय नेत्यांची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्याच परंपरेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचे प्रकाशन ग्रंथालीमार्फत होत आहे, याचा आनंद आहे,

अशी भावना सुदेश हिंगलासपूरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच यानिमित्ताने ग्रंथालीकडून ग्रंथखरेदीची अभिनव योजना जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार केवळ ३५ हजार रुपयांमध्ये ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाच्या १०० प्रती आणि सोबत ग्रंथालीची विविध मान्यवर लेखकांची अन्य १०० पुस्तके असा एकूण २०० पुस्तकांचा संच देण्यात येईल. तसेच केवळ २० हजार रुपयांमध्ये ‘योद्धा कर्मयोगी’च्या ५० प्रती आणि सोबत ग्रंथालीची अन्य ५० पुस्तके असा एकूण १०० पुस्तकांचा संच देणारी दुसरी योजनाही जाहीर करत, ग्रंथदात्यांनी ही पुस्तके शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुदेश हिंगलासपूरकर यांनी याप्रसंगी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय, सामाजिक तसेच कौटुंबिक जीवनातील संघर्षशील प्रवासाचा लेखाजोखा मांडणाऱ्या या चरित्रग्रंथाचे लेखन सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, समकालीन मंडळी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतींच्या आधारे हा चरित्रग्रंथ शब्दबद्ध केला आहे. त्यासाठी डॉ. अरुंधती भालेराव, राजन शंकर बने, सान्वी ओक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे चरित्रलेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी याप्रसंगी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय सात दशकांपूर्वी साताऱ्याहून मुंबईत आले, तिथून ते ठाणे येथे स्थायिक झाले. हा सारा त्यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. मात्र कष्टाच्या, निष्ठेच्या आणि सचोटीच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी विलक्षण झेप घेतली. या त्यांच्या वाटचालीतील विविध प्रसंग, घटना-घडामोडी यांच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि नेतृत्वाची घडण कशी झाली, हे महाराष्ट्रीय जनांपुढे मांडण्याच्या प्रांजळ हेतूने ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ हे चरित्र शब्दबद्ध केल्याचे चरित्रलेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथ असणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा ऐतिहासिक असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत तो संपन्न होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी आयोजन समितीने चोख नियोजन केले असून सुजाण ठाणेकरांच्या सहभागाने आणि सहकार्याने हा समारंभ यशस्वी होईल, असा विश्वास आयोजन समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Post Views: 49
Previous Post

उत्तरप्रदेश : भीषण अपघातात 7 ठार, 40 जखमी

Next Post

बजाजनगरातील मुख्य चौकांत मोकाट जनावरांचा ठिय्या

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बजाजनगरातील मुख्य चौकांत मोकाट जनावरांचा ठिय्या

बजाजनगरातील मुख्य चौकांत मोकाट जनावरांचा ठिय्या

ताज्या बातम्या

सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंगसाठी हालचालींना वेग आला

July 28, 2026

उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढली

July 28, 2026

संदीप देशपांडेच्या टी शर्टवर दुतर्फा मतांनी मारा

July 28, 2026

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

सोलापूर जिल्हा ज्युनिअर मैदानी ॲथलेटिक्स २ व ३ ऑगस्टला

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1006539

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!