कुर्डूवाडी – श्री भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सरकोली, ता. पंढरपूर येथे २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कुर्डूवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत १७ वर्षे मुलींच्या ७३ किलो वजनी गटात नयन विजय उबाळे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची वाशिंबे, ता. करमाळा येथील अभिनव विद्यालय येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच १४ वर्षे मुलांच्या ७५ किलो वजनी गटात नंदकिशोर विजय उबाळे याने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अमोल सुरवसे व व्यवस्थापकीय संचालिका पूजा सुरवसे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी नयन उबाळे हिला शुभेच्छा देत, दोन्ही खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Post Views: 6