सोलापूर -टीचर क्रिकेट क्लब आयोजित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ‘४० प्लस क्रिकेट स्पर्धा पर्व ३’ स्पर्धेत ‘रिचा ब्लास्टर’ संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
रेल्वे मैदानावर अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ‘रिचा ब्लास्टर’ संघाने हरलीन हिटर संघास हरविले. शिवसेना-शिंदे गटाचे नेते अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघांना करंडक व पारितोषिके प्रदान करण्यात आली. या प्रसंगी संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष शराकेश उदगिरी उपस्थित होते.
विजेत्या संघाला प्रकाश स्वामी यांचे तर द्वितीय संघाला बापू राऊत यांचे प्रायोजकत्व लाभले होते. तृतीय क्रमांकाचा बहुमान मसूद सिद्धिकी प्रायोजित ‘चरणी चॅम्पियन्स’ संघाने मिळवला, तर इरशाद शेख प्रायोजित ‘जेमीमा जागवार’ या संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अरविंद ताटे, नागेश खुणे, सचिन खरात, रवी चव्हाण, श्रीकांत काशीद व भालचंद्र हंचाटे, श्रीनिवास पाटील, षणमुख गुत्तरगी, दुर्गेश भदे, सुनील शिंदे व विनोद कोळी यांचे सहकार्य लाभले.
वैयक्तिक कामगिरी : मालिकावीर : संपत लेंडवे. फलंदाज: संपत लेंडवे, गोलंदाज: शिवाजी वसपटे. क्षेत्ररक्षक: सचिन क्षीरसागर.


















