सांगोला – जागतिक औषधनिर्माता दिन व ६ वी राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स वीक निमित्त सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) तर्फे शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याची थीम आरोग्यदायी भविष्यासाठी औषधनिर्मात्यांचे सक्षमीकरण ही होती. यावेळी सांगोला शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले. याप्रसंगी डॉ.शिवराज भोसले, गजानन बनकर, धनंजय शिंदे, मधुकर फटे, बापूसाहेब ठोकळे, संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले, विश्वस्त विश्वजीत इंगवले, सुनील कोरे, प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, श्रीकांत घोंगडे, अरविंद केदार, डॉ.महेश राऊत उपस्थित होते. डी.फार्मसी द्वितीय वर्ष, बी.फार्मसी प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान पथनाट्य सादर करून डॉक्टर व फार्मासिस्ट यांचे देशाच्या आरोग्य क्षेत्रातील महत्व व योगदान तसेच यांचे मार्गदर्शन व सल्ले न घेता अंधश्रद्धा व भोंदूगिरी मुळे नागरिकांचे आर्थिक व आरोग्याचे कसे नुकसान होते हे उपस्थित नागरिकांना सांगितले. सूत्रसंचलन प्रा.भारत गरंडे, भारती मोटे, श्रद्धा पवार यांनी केले. यावेळी कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा.एस.पी.जोकार, प्रा.एस.जे.मणेरी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक, पालक उपस्थित होते.
Post Views: 13