पंढरपूर – आषाढी शुध्द एकादशी सोहळा २५ जुलै २०२६रोजी असून , यात्रा कालावधी दि.१५ जुलै ते २९ जुलै २०२६ असा आहे. या सोहळ्या निमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.या कालावधीत पंढरपूर शहरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी दि.१५ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीमध्ये मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्रीवर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी बंदी आदेश जारी केले आहेत.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी श्री इथापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत.
——————-
चौकट : ( करकंब व परिसरात मांस, मटण विक्रीस मनाई )
आषाढी यात्रेसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून मानाच्या व महत्त्वाच्या पालख्या करकंब (ता.पंढरपूर) येथे मुक्काम करीत असतात. या ठिकाणी लाखो भाविक करकंबसह आसपासच्या गावात मुक्कामास असतात. विविध सामाजिक व राजकीय संघटनाकडून तसेच भाविकांकडून मांस, मटण विक्रीस बंदी घालावी अशी मागणी होती.त्या अनुषंगाने करकंब व पांढरेवाडी, व्होळे, देवडे, खेडभोसे येथे दिनांक २० जुलै ते २५ जुलै २०२६ या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३चे कलम १६३ (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी श्री.इथापे यांनी सदर आदेश जारी केले आहेत.
Post Views: 12