Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संतांच्या संगतीत उद्धार आणि मोकारांच्या संगतीत पतन ; पांडुरंग महाराज घुले !

तरुण भारतbyतरुण भारत
June 14, 2026
in solapur
0
संतांच्या संगतीत उद्धार आणि मोकारांच्या संगतीत पतन ; पांडुरंग महाराज घुले !
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  संतांच्या समागमामुळे माणसाला योग्य विचार आणि सन्मार्गाची प्राप्ती होते.संतांच्या संगतीत आल्यावर परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत जाता येते.संतांच्या संगतीत उद्धार आणि मोकारांच्या संगतीत पतन होते असे सांगतानाच दुर्जनाचं साधं दर्शन जरी झालं ,तरी ते आपल्या जीवनात घातक आहे ,असे विचार देहू येथील श्री.गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांनी व्यक्त केले. दमाणी नगरातील गड दर्शन समाज मंदिरात ह.भ.प.माऊली महाराज बचुटे – सवाळकर शिष्य – मित्र परिवाराच्यावतीने किर्तन महोत्सव सुरु आहे.शनिवारी रात्री झालेल्या किर्तनात पांडुरंग महाराज घुले यांनी संतांच्या सहवासामुळे आपल्याला जीवनाचे खरे उद्दिष्ट समजते ,आणि भगवंताच्या बाबतीत नितांत श्रद्धा व गोडी निर्माण होते .नामस्मरण कधीही सुटू देऊ नका ,मुखाने विठ्ठलाचा जयघोष आणि गजर करत रहा ,जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
      संतांच्या संगतीत आपलं जीवन भले होतं, असे संत तुकाराम महाराज सांगतात .चांगले आचार आणि विचार घडण्यासाठी संतांची संगत आवश्यक आहे. संतांच समागमन घडले पाहिजे.
 तुकाराम महाराज म्हणतात संतांचे समागमन घडले तर ते उपयोगालाच येणार आहेत. योग्य सतपुरुषाच्या संगतीत आले पाहिजे. संताच्या संगतीत आल्यावर अयोग्य व्यक्तीसुद्धा योग्य पद्धतीने आचरणात येतो ही ताकद संतांमध्ये आहे. सर्व सुखं संतांच्या संगतीत प्राप्त होतील. जशी संगत करतो तसे विचार आपल्या जीवनात निर्माण होतात. जसे विचार तसे आचरण होते. वाईटाच्या संगतीत वाईटच विचार होणार. संतांच्या संगतीत चांगले आचार आणि विचार होतात.संगत ही आपल्या जीवनात वेगवेगळे स्तर निर्माण करणार आहे. संत ,दर्शनातून आणि शब्दातून कृपा करतात. संत ,योग्य दिशा देत असतात.वाल्या हातात कुऱ्हाड घेऊन लुटण्यासाठी आला होता.नारदाच्या समागमात आल्यावर मन परिवर्तन झाले.तुकोबारांयांच्या अभंगाने दगडालासुद्धा तारले.अभंग तरले म्हणून आपण तरलो आहोत असे सांगतानाच व्यसन सोडा, शाकाहारी बना , मुलांना भजन,किर्तन , वारकरी व आध्यत्मिक शिक्षण देणे काळाची गरज बनलीअसल्याचे पांडुरंग महाराज घुले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
      पांडुरंग महाराज घुले,म्हणाले संत संगतीमुळे जीवनातील अज्ञान दूर होते आणि मनाला शांती लाभते .संसारात राहून सुद्धा भगवंताच्या चरणी लीन होणे आणि इतरांच्या कल्याणासाठी झटणे हाच खरा धर्म आहे.संत समागमामुळे विचार शुद्ध होतात, जीवनाला योग्य दिशा मिळते आणि राम नामाची गोडी लागते. संत नेहमीच चांगल्या संगतीची शिकवण देतात .संतांच्या सहवासात आल्यावर माणसाचे विचार बदलतात. भगवंताचे नाम मुखात असणे आणि संतांच्या विचारावर श्रद्धा ठेवणे याच विचाराने जीवन आनंदी आणि परिपूर्ण बनते. भगवंताच्या नामाशिवाय मानवी मन अशांत असते .नाम चिंतनाने अंत;करणातील सर्व दोष निघून जातात.भगवंताचे नामस्मरण करत असताना आपल्यातून कोणत्याही प्रकारची वाईट कृती घडणार नाही ,याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि भगवंताच्या चरणी आपली भक्ती अर्पण करावे .संतांची संगती धरावी ,संतांचे विचार हे कल्पवृक्षासारखे असतात ,ते आपल्याला मायेच्या अंधारातून बाहेर काढून परमार्थाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात .त्यामुळे एकमेकांना समजून घेणे आणि प्रेमभाव टिकवून ठेवणे हीच खरी भक्ती आहे संत संगतीमुळे जीवनातील अज्ञान दूर होते आणि मनाला शांती लाभते , असेही घुले महाराज म्हणाले.
Post Views: 11
Previous Post

युवाशक्ती विकास आघाडी,मोडनिंब स्वतंत्रपणे ग्रामपंचायत पॅनल लढविणार

Next Post

आर्या कृषी महाविद्यालयास मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षण अभ्यासकेंद्राची मान्यता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आर्या कृषी महाविद्यालयास मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षण अभ्यासकेंद्राची मान्यता

ताज्या बातम्या

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026
वरिष्ठ लेखाधिकारी पदाचा प्रज्ञा कांबळे यांनी स्वीकारला कार्यभार

वरिष्ठ लेखाधिकारी पदाचा प्रज्ञा कांबळे यांनी स्वीकारला कार्यभार

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0909577

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697