सांगोला – सांगोला येथील समृद्धी शशांक गुळमिरे हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टिम्स सेंटर (एलपीएससी) येथे प्रोजेक्ट इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या माध्यमातून तिला भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील अभियांत्रिकीविषयक कार्यपद्धती जवळून समजून घेण्याची संधी मिळणार आहे. ही इंटर्नशिप दि.१५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणा नगर येथे ती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत आहे. तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत डॉ.विनय कोरे यांनी तिला स्कॉलरशिप प्रदान करून सत्कार केला. या यशाबद्दल समृद्धी गुळमिरे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने कौतुक केले जात आहे.
Post Views: 4