सांगोला – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडून आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे एकूण ५६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून या विद्यार्थ्यांना पुढील चार शैक्षणिक वर्षांमध्ये एकूण रु.२६ लाख ८८ हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरत आहे.
शिष्यवृत्ती मिळवण्यात सांगोला विद्यामंदिर प्रशालेने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची परंपरा कायम राखली असून राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख निलेश जंगम, मंगेश म्हमाणे, राजेंद्र ढोले, अमोल महिमकर, मनीषा पांडे, शितल कांबळे, सिताराम राऊत, रोहिणी शिंदे, सचिन बुंजकर, कविता राठोड, विनीत चिकमने, शिवानंद लोखंडे, सविता गायकवाड, अजित मोरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चारुदत्त जगताप, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासो नरुटे, परीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे व सिताराम राऊत यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे-
सुबोधिनी इंगवले, विक्रांत बनकर, श्रेयस देशमुख, आराध्या पाटील, हर्षवर्धन शिंदे, ऋषिकेश केदार, स्वरा बाजारे, स्वराज शेळके, प्रणिती चव्हाण, प्रथमेश भोसले, प्रतीक सादिगले, अक्षदा भोकरे, ओम लिगाडे, स्नेहल सावंत, श्रीवर्धन लिगाडे, श्रुती होवाळ, श्रावणी भाले, श्रावणी बुरांडे, श्रेयश येडगे, तेजस्वी यादव, केतकी साळुंखे, तनुजा बंडगर, पार्थ सावंत, कल्याणी वाघमारे, आदिती वेदपाठक, फलक शेख, कल्याणी चव्हाण, जयदीप जगताप, श्रेयश पवार, श्रेयश पाटील, अस्मिता पाटील, आयान शेख, सार्थक महाजन, भक्ती गुळमिरे, श्रवण राऊत, श्रेया बनकर, शुभम कुंभार, रिदा इनामदार, निकिता माळी, प्रणिती झाडबुके, अर्जुन आदलिंगे, गौरव लिंगे, स्वरा गुळमिरे, व्यंकटेश कपडेकर, पार्थ गावडे, श्रुती खरात, सिद्धी लवटे, प्रेम निर्मळ, सुप्रिया खडसरे, वैभव सुरवसे, समर्थ गेजगे, सार्थक कांबळे, गीतांजली गेजगे, स्नेहा कांबळे, अनुष्का खडतरे, अस्मिता माने


























