Thursday, April 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानव मुक्तीसाठी होता – प्रा डी. डी. मस्के

तरुण भारतbyतरुण भारत
April 16, 2026
in editor
0
चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानव मुक्तीसाठी होता – प्रा डी. डी. मस्के
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. हा सत्याग्रह केवळ पाणी पिण्यासाठी नसून तो समस्त मानव मुक्तीसाठी होता, असे विचार प्रा. डी. डी. मस्के यांनी व्यक्त केले.

बार्शी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय   वसतिगृह (नवे व जुने) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वस्तीगृह यांनी आयोजित केलेल्या समता सप्ताहामध्ये, “चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मानवी हक्क” या विषयावर प्रा.डी.डी. मस्के बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीचे बंड किंवा मानवतेच्या क्रांतीचा झेंडा उभा करण्याचे निश्चित केले होते. कारण भेटीबंदी, लोटेबंदी, रोटी बंदी आणि बेटी बंदी अशा बंदी तोडण्यासाठी हा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रमंडळीमध्ये जाहीर केला आणि या बंडाची सुरुवात कुठे आणि कशी करावी? हा प्रतिकाराचा लढा कुठून सुरु करावा? याबद्दल विचारविनिमय सुरु केला. प्रथम त्यांनी पंढरपूर या ठिकाणी हा प्रतिकाराचा लढा उभा करावा, असा त्यांचा विचार होता. परंतु वारकरी संप्रदायाचे भक्तीपीठ असलेले पंढरपूर अवघा महाराष्ट्र विठ्ठल चरणी लिन होतो. इथेच पहिला हल्ला चढवला तर? परंतु चंद्रभागेचे वाळवंट हे रावबहादूर सी.के. बोले ठरावाच्या कक्षेत बसेल का? त्यासाठीची चढाई व लढाई टिकवता येईल का? कारण त्यात मारामाऱ्या, सरकार दरबार, कोर्ट, कचेऱ्या तुरुंगवास, दंड यात अमाप पैशाचा आणि वेळेचाही व्यय होईल, असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी पंढरपूरचा विचार सोडून दिला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा कोकणात करण्याचे निश्चित केले. कारण कोकणी माणसे लढाईला फार आसुसलेली असतात. कोकणात पण कुठे? आणि कोणत्या जिल्ह्यात? हा झेंडा उभा करायचा हा विचार मांडताना डॉ.आंबेडकर म्हणाले की, मला रायगडच्या आसपासची जागा हवी. सहकाऱ्यानी विचारले का? डॉ.आंबेडकर म्हणाले कारण ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी झाला. शूद्र म्हणून शिवरायांचा अपमान केला गेला? गागाभट्टाने दक्षिणा घेऊन वेदोक्त पद्धतीने हा राज्याभिषेक केला.

निश्चलपुरी गोसावी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणाले की, आपण शुद्र आहात तरीही क्षत्रियत्वाची जागा घेतली. तुम्ही भ्रष्टाचार केला.असे म्हणून तो रायगडावर ठाण मांडून बसला. त्यांनी एक भविष्यवाणी केली.१३ व्या दिवशी, २२ व्या दिवशी आणि ५५ व्या दिवशी अशुभ घटना घडतील. दुर्दैवाने निश्चलापूरी यांची ही भविष्यवाणी खरी ठरली. १३ व्या दिवशी मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन झाले. २२ व्या दिवशी प्रतापगडावरील अश्व शाळेला आग लागून ती खाक झाली तर ५५ व्या दिवशी सिंहगडावरील महाराजांचा आवडता हत्ती मेला.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, काय केल्याने पापक्षालन होईल? निश्चलपुरी म्हणाले, राज्याभिषेक पुराणोक्त पद्धतीने केला पाहिजे. हा प्रसंग सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, मराठ्यांच्या छत्रपतींचे ब्राह्मणांनी इतकी दुर्दशा केली तरी मराठे मूग गिळून का बसले? कायस्थ गप्प का बसले? अहो ही सारी माणसे हिंदू धर्मातील विचारसरणीची गुलाम होऊन बसली होती. गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न सत्यशोधक चळवळ करत होती पण ती तशीच आहे. अनंतराव, या गुलामगिरीला चांगला धक्का बसावा व तो अस्पृश्यांच्या क्रांतिकारक समतेच्या चळवळीतून बसावा अशी माझी इच्छा आहे. मग मराठी व इतर तत्सम जातीचे डोळे उघडतील. हे साधले तरी ही मंडळी अस्पृश्यांकडे आपुलकीने पाहावयास लागतील. तेव्हाच हिंदू समाजात सामाजिक समता प्रस्थापित करता येईल म्हणून रायगडाच्या आसपास आपल्या बंडाला क्षेत्र मिळाले पाहिजे.

अनंतराव चित्रे म्हणाले, अशी जागा आमच्या महाडला आहे. महाड नगरपालिकेने १९२४ ला बोले ठरावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे सुरबानाना टिपणीस हेच नगराध्यक्ष आहेत. 

१९ आणि २० मार्च १९२७ ला महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.

हा सगळा इतिहास सांगून प्रा. डी.डी. मस्के पुढे म्हणाले की, मानवी हक्कांच्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशन, सायमन कमिशन, गोलमेज परिषदा, समाज समता संघ, संयुक्त राष्ट्रांचा जाहिरनामा इ.बाबत चर्चा केली.

कमलाकर सारंगकर, रमेश गवळी सर यांचे ही समयोचित भाषण झाले.

यावेळी कमलाकर सारंगकर, सुभाष भोसले,व तिन्ही वसतीगृहातील कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

Post Views: 8
Previous Post

मंद्रूप बॅक ऑफ इंडियात डाॅ. आंबेडकर जयंती साजरी

Next Post

संतश्रेष्ठ गोरोबा काका व श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
संतश्रेष्ठ गोरोबा काका व श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी साजरी

संतश्रेष्ठ गोरोबा काका व श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी साजरी

ताज्या बातम्या

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

April 16, 2026
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

April 16, 2026
ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

April 16, 2026
आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

April 16, 2026
जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 16, 2026
शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

April 16, 2026
जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

April 16, 2026
निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

April 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0812326

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697