Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परतूर मतदारसंघातील शिवसैनिक भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – -शिवाजीराव चोथे..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2024
in top news
0
परतूर मतदारसंघातील शिवसैनिक भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – -शिवाजीराव चोथे..
0
SHARES
127
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हक्काचा आपला माणूस म्हणून ए.जे. बोराडे यांना विधानसभेत पाठवा – प्रा.डॉ. गोपाल बच्छीरे)….. मंठा/ प्रतिनिधी : भाजपा हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे, 2014 मध्ये भाजपने युती तोडली. भाजपचे अनेक लोक शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले, आता या निवडणुकीत परतुर मतदारसंघातील शिवसैनिक भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माजी आमदार तथा परभणी लोकसभा समन्वयक शिवाजीराव चोथे यांनी व्यक्त केला. मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात गुरुवार ता. 25 रोजी आयोजित शिवसेना सदस्य नोंदणी आरंभ व बूथप्रमुख, पदाधिकारी बैठकीत श्री चोथे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना संघटक प्रा.डॉ. गोपाल बच्छीरे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, ज्येष्ठनेते अंकुशराव अवचार, परतुर तालुकाप्रमुख सुदर्शन सोळंके, मंठा तालुकाप्रमुख अजय अवचार,विधानसभा समन्वयक अशोक आघाव, युवा सेना जिल्हा समन्वयक महेश नळगे, बेबीताई पावसे, बालासाहेब बोराडे, जे. के.कुरेशी, शहरप्रमुख वैजनाथ बोराडे, सुभाषराव घारे यांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना श्री चोथे म्हणाले की, परतुर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा अशी मागणी करण्यात आली असून पक्षाचे निष्ठेने कार्य करणारे जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असे सांगून त्यांनी उपप्रमुखांकडून गाव निहाय आढावा घेतला. प्रा.डॉ. गोपाल बच्छीरे गद्दारांनी पक्ष चोरला चिन्ह चोरले झेंडे बदलले नेते बदलले मात्र निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली.

या सरकारच्या लाडकी बहीण लाडक्या भाऊ या योजना फसव्या आहेत त्यांना त्यांची जागा वेळीच दाखवून देण्याची ही वेळ आली आहे. भाजपा पूर्णपणे जातीवादी पक्ष असून सत्तेसाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बूथप्रमुखांनी संपूर्ण मतदार यादीवर आतापासून लक्ष केंद्रित करावे असे आवाहन केले. मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वांनी तयारीला लागा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे प्रास्ताविक करताना म्हणाले की, परतुर मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली, या मतदारसंघात 30-35 वर्षापासून शिवसेनेचे प्रचंड जाळे निर्माण झाले आहे.

गावागावात तांड्या तांड्यात वस्ती वाडीवर जाऊन शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारी ही जागा असेल अशी ग्वाही दिली. या निवडणुकीत भाजपची हुकुमशाही, सत्ता आणि पैशाचा माज उतरविण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे, भाजपला या मतदारसंघातून हद्दपार करण्याच्या तयारीला लागा असे आवाहन त्यांनी केले. जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करण्याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला माजी सभापती संतोष वरकड बाबाराव राठोड सुरेश सरोदे माऊली सरकटे, संजय नागरे,मधुकर काकडे डॉक्टर दत्तात्रय काकडे, डॉ. संतोष पवार, ॲड.ज्ञानेश्वर जाधव, अरुण उफाड, केशव महाराज सरकटे, दत्ता पा. सुरुंग, तुळशीराम कोहिरें, वसंतराव राऊत, दासू खरात, बबन शेळके, पांडू वैद्य, विष्णुपंत खराबे, आसाराम बोराडे, संतोष वरकड, डॉ. उद्धव उबाळे, रामेश्वर शिंदे, कैलास पोटे, बंडू मोरे, अशोक मुरकुटे, अचित बोराडे, प्रदीप बोराडे, अरुण वाघमारे, उबेद बागवान, दिगंबर बोराडे, नाना बोराडे, संदीप वायाळ, शेख अन्सार, मनु गिरी, नवनाथ अवचार, अनु काकडे, मनोज वायाळ,संतोष खारवणे, दिलीप कव्हळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्पू दायमा यांनी केले.

मतदारसंघातील भाजपची मस्ती उतरवा — ए.जे. बोराडे…. परतुर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे, भाजपची हुकूमशाही, मस्ती, सत्ता आणि पैशाचा माज उतरविण्याची वेळ आहे. या निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रचंड ताकदीने कामाला लागावे असे सांगून या मतदारसंघात 50 हजार शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी केले.

Post Views: 41
Previous Post

मोदी आवास योजनेतील घरकुलासाठी तात्काळ निधीची तरतूद करावी ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

Next Post

कोल्हापूरची चिंता वाढली, राधानगरी ओव्हरफ्लो

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कोल्हापूरची चिंता वाढली, राधानगरी ओव्हरफ्लो

कोल्हापूरची चिंता वाढली, राधानगरी ओव्हरफ्लो

ताज्या बातम्या

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026
महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

July 28, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

July 28, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 28, 2026
आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

July 28, 2026

तीनदा बदली, सुट्टीच्या दिवशी आदेश; आरोग्य विभागातील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी

July 28, 2026

अधिकार नसताना बिलांचा व्यवहार; ग्रामसेवक निलंबित

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1009892

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!