सोलापूर – माजी विरोधी पक्षनेता सो.म.पा. तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने सत्कार व स्नेह गाटी-भेटींच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार विजयकुमारजी देशमुख, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योतीताई वाघमारे, माजी आ. दिलीपरावजी माने, महेशजी गादेकर, चेतन नरोटे, संकेत पिसे, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, अनिकेत दादा पिसे, विनोद भोसले, अमोलराजे भोसले, आबासाहेब थोरात, यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योजक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.















