बार्शी – श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी व श्री सद्गुरु बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त विशेष प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ पासून दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ही प्रवचनमाला होणार आहे.
यावर्षी ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांच्या अमृतवाणीतून “श्रीमद्भागवत कथा चिंतन – भाग २” या विषयावर संपूर्ण श्रावण महिनाभर निरुपण होणार आहे.
डॉ. जयवंत महाराज बोधले हे बार्शी तालुक्यातील धामणगांव येथील असून, श्री संत माणकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज आहेत. सन २००३ पासून श्री भगवंत मंदिरात श्रावणमास प्रवचनमालेत त्यांनी विविध आध्यात्मिक विषयांवर निरुपण केले आहे. यावर्षी ही प्रवचनमाला सलग २२ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
यापूर्वी त्यांनी श्री संत नामदेव महाराज चरित्र, हरिपाठ, श्रीकृष्ण चरित्र, विष्णुसहस्रनाम, श्री संत माणकोजी महाराज चरित्र, चांगदेव पासष्टी, श्री संत तुकाराम महाराज चरित्र व तत्त्वज्ञान, श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र व तत्त्वज्ञान तसेच श्री संत एकनाथ महाराज चरित्र व तत्त्वज्ञान अशा अनेक आध्यात्मिक विषयांवर महिनाभर निरुपण केले आहे.
श्रावण महिन्यात नवीन आध्यात्मिक विषयावर होणारी ही प्रवचनमाला बार्शी शहर व पंचक्रोशीमध्ये लोकप्रिय ठरली असून, यंदाच्या “श्रीमद्भागवत कथा चिंतन – भाग २” या प्रवचनमालेचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच श्री. दिलीपदादा बुडूख तसेच श्री सद्गुरु बोधराज भक्त मंडळाचे प्रा.
विलास जगदाळे यांनी केले आहे.
Post Views: 3