वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे श्रावणमास निमित्त महिनाभर चालू असलेल्या कार्यक्रमाचे गुरुवार दि.१७ सप्टेंबर रोजी श्री चन्नय्या स्वामी मठात विविध धार्मिक कार्यक्रमासह समाप्ती संपन्न होणार आहे.दि.१७ सप्टेंबर वार गुरुवार रोजी पहाटे ५ वाजल्यापासून श्री चन्नय्या स्वामी यांच्या मूर्ती लघुरुद्राभिषेक करण्यास सुरुवात होईल. नंतर नगारी व शंखनाद सह स्वामींचे नामस्मरण करण्यात येईल. १२व्या शतकातील तसेच जुन्या काळाची आरती गीत कन्नड मध्ये सलग ०३ तास महाआरती केला जातो. त्यानंतर मूर्तीवंत चन्नय्या स्वामी जेव्हा जिवंत होते त्यावेळी बुर्रा कथा प्रमाणे शंकराची गाणी गात बेडा जंगम वेशभूषा परिधान करून सादर करतात. हि कलेची परंपरा जोपासली पाहिजे असे आशीर्वाद व जनतेला आदेश दिले सुमारे २६० वर्षा पासून “सांब सदा शिव सांब सदा शिव” या भजनावर पारंपारिक नृत्य साजरा केला जातो.
या मठाची खीर व कर्णीकाई खारा (ईडलिंबू चटणी) प्रसिद्ध आहे सर्वकाही भक्ताकडूनच भक्तांसाठी महाप्रसादाचा वाटप होणार असल्याचे अध्यक्ष मल्लिनाथ बाबानगरे यांनी या सर्व गोष्टीसाठी चन्नय्या स्वामींचे आशीर्वाद आहेच असे सांगितले. विधिवत पूजा पुजारी नागय्या स्वामी यांच्या हस्ते होत आहे. या सर्व माहिती देताना उपाध्यक्ष अनिल शहापुरे, सचिव चंद्रशेखर केशट्टी, खजिनदार सचिन तडलगी,श्रीशैल भैरामडगी, बसवराज किणगी, शिवानंद घोडके, शिवबसप्पा कलशेट्टी, सोमशेखर केशट्टी उपस्थित होते.