सी.एफ.ए.प्रोग्रॅम लेव्हल फस्ट मध्ये कु.श्रृती सुरेश पवार हिने विक्रमी गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात उज्वल यश संपादन केले आहे.
जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी ही परिक्षा असून आर्थिक व गुंतवणूक विश्लेषकांची क्षमता आणि सचोटी मोजते व प्रमाणित करते.
पुणे येथील विदयुत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंते सुरेश बहिरू पवार यांची ती सुकन्या असून शिक्षण प्रसारक मंडळ,मंगळवेढाचे खजिनदार तथा ज्येष्ठ पत्रकार राम नेहरवे यांची ती नात आहे. या यशाबद्दल माजी प्राचार्य डॉ.सुभाष कदम,डॉ.मिनाक्षी कदम,शिक्षण प्रसारक मंडळ,संस्था परिवाराने अभिनंदन केले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















