Sunday, May 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टीईटी सक्ती निर्णयाविरोधात हजारो शिक्षकांचा मूक मोर्चा

तरुण भारतbyतरुण भारत
November 10, 2025
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार, ज्या शिक्षकांची सेवा निवृत्तीसाठी ५ वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे, त्यांना दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास, दोन वर्षांनंतर सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल.


या निर्णयामुळे राज्यातील इयता पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात सापडल्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षकांच्या सेवेला संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्यात आला. या मुक मोर्चात जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी शिक्षकांच्या २५  पेक्षा जास्त शिक्षक संघटना एकवटल्याचे  दिसून आले. सकाळी ११ वाजता चार हुतात्मा चौक येथून मुक मोर्चाला सुरुवात झाली.

यावेळी हजारो शिक्षकांच्या हातामध्ये ‘ आमचा अनुभव हीच आमची पात्रता, अन्यायकारक टिईटी रद्द करा, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा, लढाई अस्तित्वाची,टिईटी सक्ती विरोधाची ‘ या आशयाचे फलक होते. मुक मोर्चा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ आल्यावर या ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या  पदाधिकाऱ्यांनी बोलताना, आपल्या शिक्षक संवर्गात एकी नाही, आपण सगळं सहन करतो यामुळेच आपल्यावर आज ही वेळ आली आहे. 

शिक्षक संवर्गावर १५ मार्च २०२४ ची अन्यायकारक संचमान्यता लादून शिक्षणसेवक योजना लागू केली, जुनी पेन्शन योजना बंद केली, प्राथमिक शाळांमधून लिपिक शिपाई पदे बंद करणे, बीएलओचे काम लावले, १५० पेक्षा जास्त ऑनलाईन कामे लावली, अशा कित्येक बाबी शासनाने आपल्यावर लादल्या.


टीईटी सक्तीच्या विषयाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसह १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षणसेवक पद रद्द करणे, शिक्षकांना दिली जाणारी सर्व ऑनलाईन कामे त्वरित बंद करावीत , सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी आणि वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा सेवाकालात ग्राह्य धरावी या मागण्या यावेळी निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आले. यावेळी शिक्षकांच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील व शिक्षणाधिकारी कादर शेख यांना देण्यात आले.
 

टीईटी संदर्भामध्ये शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून, अनेक जिल्हा परिषदेच्या पदोन्नत्या थांबल्या आहेत. पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे.
आश्रमशाळेतील शिक्षकांना तर टीईटी उत्तीर्ण न झाल्यास वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


  यावेळी माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत, अण्णासाहेब भालशंकर,   शामराव जवंजाळ, कल्लाप्पा फुलारी, शिवानंद भरले, बापूसाहेब आडसुळ, निलेश देशमुख, प्रतिभा पांडव,डॉ बी. पी. रोंगे, संजीव चाफाकरंडे, भीमराया कापसे, इत्यादी शिक्षक संघटना नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले. मोर्चाचे प्रास्ताविक विरभद्र याडवाड यांनी केले. सूत्रसंचालन रविराज खडाखडे यांनी केले तर संभाजी फुले   यांनी सर्वांचे आभार मानले.
  या मोर्चाला शिक्षक सेनेचे राज्य प्रमुख रमेश चौगुले, सुनिल चव्हाण, सुजित काटमोरे, इक्बाल नदाफ,    रवी देवकर,रामभाऊ शिंदे,सचिन चौधरी, आप्पासाहेब पाटील, सुधीर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Post Views: 44
Previous Post

लख्ख प्रकाशात उजळले श्री गणेश मंदिर, कार्तिक संकष्टीनिमित्त दीपोत्सव

Next Post

क्रीडा शिक्षक सतीश कदम यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सन्मान !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

क्रीडा शिक्षक सतीश कदम यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सन्मान !

ताज्या बातम्या

कांतारा नव्हे वळसंगचे बाळबट्टल #viral #solapurnews

May 17, 2026

जागर यात्रेने सर्व युवकांना जोडणार कृष्णराज महाडिक

May 17, 2026

नसरापूरच्या चिमुकलीसाठी पुढाकार घेणार महाडिक

May 17, 2026

पाण्यावरून शिवसेनेच्या अमोल बापू शिंदेनी केली भाजपवर कडक टिका

May 17, 2026

आम्हाला किंमत का देत नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात घातली फरशी #marathinews #solapurnews

May 17, 2026

५० लाखांसाठी विवाहितेचा छळ #solapurnews #viral

May 17, 2026

पैसे नव्हे थेट एटीएम पळवली #marathinews #viral

May 17, 2026

मेफेड्रोन प्रकरणी साहिल पिरजादेला वाढीव कोठडी #marathinews #solapurnews

May 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0868328

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697