सोलापूर – जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दि. 27 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली 19 वर्षांखालील (U-19) मुला-मुलींची निवड चाचणी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ही निवड चाचणी ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे पार पडली.
या निवड चाचणीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विश्वजीत पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अश्विन सावळगी, प्रा. नरेश पाटील तसेच क्रीडा संचालक प्रा. शिवशरण कोरे हे प्रमुख उपस्थित होते.
निवड चाचणीदरम्यान जिल्ह्यातील विविध शाळेतील उमाबाई श्राविका, एस.आर चंडकप्रशाला, सिद्धेश्वर प्रशालाव ग्रामीण भागांतील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. खेळाडूंच्या कौशल्याचे मूल्यमापन प्रशिक्षक व निवड समितीमार्फत करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची दि. 4 ते 6 जून 2026 दरम्यान उदगीर जि. लातूर येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार असल्याची माहिती निवड समिती प्रमुख सुहास छंचुरे यांनी दिली.
या निवड चाचणी स्पर्धेसाठी ग्रामीण व शहरी भागातील एकूण 60 खेळाडूंनी सहभाग नोंदवले. जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटला चालना मिळणार असल्याचे मत प्राचार्य यांनी व्यक्त केले.स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रा. प्रमोद चुंगे,क्रीडा शिक्षक धर्मराज कट्टीमनी, प्रथमेश जाधव, गणेश जाधव, यश दिंडोरे, चंद्रकांत हन्नूरे, गणेश राऊत यांनी परिश्रम घेतले
फोटो ओळी :- स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ विश्वजीत पोतदार, अश्विन सावळगी, प्रा. नरेश पाटील, क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे, जिल्हा सचिव प्रा. शिवशरण कोरे व खेळाडू उपस्थित होते.
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...